वणी (जि. नाशिक) : – चिखलआंबे, ता. चांदवड शिवारातील शरद वसंत आमले, यांचे शेत गट नंबर १९५ /१ मध्ये असलेल्या बोअरवेल (Borewell) मध्ये ४०० फूट खोल सोडलेली इलेक्ट्रिक मोटार (Electricity Motor) त्यासाेबत सोडलेली केबल व ४०० फूट पाईप कनेक्शन पाण्याच्या प्रवाहासोबत बाहेर फेकून दिली.
बोअरवेल मधून निघणारे पाणी जमिनीपासून सुमारे १०० फूट उंची पर्यंत 40 मिनिट चालू होते. मागील तीन -चार वर्षात पावसाळ्यात हयाच बोअरवेल मधून चार ते पाच फुट बोअरवेल मधील पाईप बाहेर येवून पाणी बाहेर पडल्याची घटना घडली होती.
मात्र यावर्षी सदर बोअरवेल मधील असलेली मोटरसह अतिशय वेगाने बाहेर फेकून देवून पाण्याचा फवारा उडू लागल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मोटर उंच उडाल्याने मोटरचे दोन तुकडे झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी असलेले चिखलआंबेचे सरपंच अरुण पगार यांनी सांगितले. दरम्यान आज सकाळी सरंपच अरुण पगार, चिखलआंबेचे तलाठी पवार, ग्रामसेवक नागरे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहाणी केली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






