भुसावळ :- सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यात बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आलीय. झेलम एक्स्प्रेसमध्ये रेल्वेच्या पॅंट्री कारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १४ वर्षीय अनाथ मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. ही मुलगी भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या सदस्याला रेल्वे फलाटावर रडताना दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. भुसावळ रेल्वे पोलिसांनी या घटनेनंतर पीडितेच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पुणे जीआरपीने तिघांना अटक करत त्यांची चौकशी सुरु केली
नेमकी कशी घडली घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी विनातिकीट झेलम एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत होती. ती एका एसी कंम्पार्टमेन्टमध्ये असताना तिची पॅन्ट्रीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने चौकशी केली. तुला टीसीकडे देईन, अशी भीती घालत कर्मचारी तिला पॅन्ट्री कारमध्ये घेऊन गेला. तिथे नेत त्यानं तिला जेवणं देतो, असं म्हणत भूलही लावली. यानंतर तिच्यावर पॅन्ट्रीत हैवानी कृत्य केलं. त्यादरम्यान, तिथे इतर दोन कर्मचारीही होते. पण त्यांनीह त्याला रोखण्याचाही प्रयत्न केला नाही. यानंतर पीडितेला भुसावळ रेल्वे स्थानकात उतरवण्यात आलं.
ही मुलगी भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या सदस्याला रेल्वे फलाटावर रडताना दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. का रडते? असे विचारले असता, मुलीने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 नुसार बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) च्या कलम 4 आणि 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर भुसावळ जीआरपीकडून पुणे जीआरपी पथकाला कळवण्यात आलं. या कर्मचाऱ्यांचा गणवेश, त्यांची चेहरापट्टी याच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर हे आरोप घोरपडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनीहा सगळा परिसर पिंजून काढत अखेर बलात्कार प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतलंय. आता त्यांची चौकशी केली जातेय. पोलिसांकडून आता पुढील तपास केला जातोय.
हे वाचलंत का ?
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.