अमरावती (आंध्रप्रदेशची राजधानी) : – आंध्रप्रदेशमधील ( Andhrapradesh) तिरूपती तिरूमला बालाजी मंदिरात देशभरातून भक्तांची रीघ लागलेली असते. पण ज्या गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असेल अशा गाड्यांना तिरूमला देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांकडून अडवण्यात येत असल्याचा धक्कादायक दावा महाराष्ट्रातील एका भाविकाने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
तिरूमला मंदिराच्या चेक पोस्टवर ही वाहने अडवण्यात येत असल्याची माहिती सदर व्यक्तीने दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती गाडीतून काढून टाका अन्यथा पुढे जाऊ दिले जाणार नाही असं बालाजी मंदिराच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचा दावा सदर व्यक्तीने केला आहे.
या घटनेनंतर अनेकांकडून मंदिरावर आक्षेप घेतले जात असून देवस्थानाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या मुर्त्यावर बंदी घातली तर आम्ही महाराष्ट्रीतल लोकं तिथे येणार नाहीत अशा शब्दांत रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर यासंबंधी देवस्थानाला विचारले असता त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गाडीमध्ये मुर्ती, फोटो, राजकीय निशाणी असलेल्या वाहनांवर एका दशकांपूर्वी बंदी घातल्याचं स्पष्टीकरण देवस्थानने दिलं आहे. अडवलेल्या गाडीतील मुर्ती शिवाजी महाराजांची असल्याचं समजताच त्या गाडीतील भाविकांना प्रवेश देण्यात आला आहे. पण असून सदर भाविकाने केलेले आरोप खोटे असल्याचं स्पष्टीकरण बालाजी देवस्थानने दिलं आहे.
व्हायरल व्हिडीओबाबत संस्थानचे आले स्पष्टीकरण
तिरुमाला तिरुपती संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयातून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओमधून करण्यात आलेल्या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. भाविकांना त्यांच्या वाहनांमध्ये मूर्ती, छायाचित्रे, राजकीय पक्षाचे ध्वज आणि चिन्हे, मूर्तिपूजकप्रचार साहित्य तिरुमालाला नेण्यास मनाई आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वाहनअलिपिरी चेक पॉइंटवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवून त्याची तपासणी केली होती. यावेळीसुरक्षा कर्मचाऱ्यांनी काळ्या रंगातील पुतळा ओळखला. ती मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांचीअसल्याचे कर्मचाऱ्याने ओळखले आणि त्यांना तिरुमला येथे जाऊ दिले, असं पत्रकात म्हटलेआहे.
सदरील व्यक्तीला देवतांची चित्रे वगळता व्यक्तींचे मूर्ती, राजकीय पक्षांचे ध्वज आणि इतरचिन्हे प्रदर्शित करू नयेत, असे सांगण्यात आले. पण भक्ताने आमच्यावर शिवाजीमहाराजांचा अपमान केल्याचा आरोप करत कडक भाषेत एक व्हिडिओ बनवला. आणिइतरांना चिथावणी देण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल केला, असं देखील स्पष्टीकरणदेण्यात आले आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






