नापास करण्याची धमकी देत बलात्कार; लग्नानंतर पतीला पाठवले अश्लील व्हिडिओ

Spread the love

ग्वाल्हेर : – सध्या देशात बल्तकार झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच चालली आहे अश्यातच नापास करण्याची धमकी देत कॉलेजच्या प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर (Student) बलात्कार (Abuse) केला. तसेच न्यूड व्हिडिओही (Bad video) तयार केला. न्यूड व्हिडिओच्या माध्यमातून बलात्कार सुरूच ठेवला. विद्यार्थिनीचे लग्न झाल्यावर प्राध्यापकाने भेटण्यासाठी दबाव आणला. विरोध केल्यावर प्राध्यापकाने व्हिडिओ पतीच्या मोबाईलवर पाठवला. ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात घडली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय विद्यार्थिनी ही छतरपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती ग्वाल्हेरमध्ये एमफिलचे शिक्षण घेत होती. तिची कॉलेजमध्ये प्राध्यापक डॉ. अंगद सिंह यांच्याशी भेट झाली. एके दिवशी प्राध्यापकाने तिला नापास करण्याची धमकी देऊन बलात्कार (Abuse) केला. यावेळी प्राध्यापकाने व्हिडिओही काढला. त्यानंतर प्राध्यापकाने व्हिडिओ (Bad video) व्हायरल करण्याची धमकी देत ​वारंवार ​बलात्कार केला.

काही दिवसांनी विद्यार्थिनीचे (Student) लग्न झाले. परंतु, प्राध्यापक आपल्या घृणास्पद कृत्यापासून परावृत्त झाला नाही. प्राध्यापकाने न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीला संबंध ठेवण्यास बाध्य करीत होता. नकार दिल्यावर न्यूड व्हिडिओ तिच्या पतीला पाठवला. हा प्रकार पतीला समजल्यानंतर घटस्फोट दिला. छळाला कंटाळून पीडितेने आरोपी प्राध्यापकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार