इंदापूर ( बारामती ): – बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत पायलट प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार आज सकाळी बारामतीतून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र अचानक विमानातील इंधन संपल्याने इंदापूर येथील एका शेतामध्ये एक विमान कोसळून अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कार्व्हर एव्हिएशनचे हे विमान असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात विमानातील एक वैमानिक जखमी झाली असून, त्यांना उपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल शेळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. भाविका राहुल राठोड असे जखमी झालेल्या वैमानिकेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत पायलट प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार आज सकाळी बारामतीतून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र, अचानक या विमानातील इंधन संपले आणि ते इंदपूर तालुक्यातील कडबनवाडी येथील बारहाते यांच्या शेतात कोसळले. या अपघातात जखमी झालेल्या भाविका या कार्व्हर एव्हिएशनमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.


ही घटना समजताच शेजारील पोंदकुले वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोचले त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरित्या बाहेर काढले. या महिला पायलटला किरकोळ जखमा झाल्या असून, विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बारामती येथील कारवार एव्हिएशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे.


हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






