निमखेडी शिवार मोटारसायकल चोरी प्रकरणी दुसरा एक आरोपी अटकेत,दोघांना दोन दिवस पोलीस कोठडी.

Spread the love

सोयगाव,दि.२५…निमखेडी शिवारातून शेतीच्या बांधावरून शेतकऱ्याची मोटारसायकल चोरी प्रकरणी रविवारी पाचोरा येथील एक आरोपी सोयगाव पोलिसांनी अटक केला असून सोमवारी सिल्लोड न्यायालयात हजे केले असता त्या दोघांची गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.निमखेडी ता.सोयगाव शिवारातून शेतीच्या बांधावर उभी असलेली मोटारसायकल चोरी झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती.

या प्रकरणी शेतकऱ्याने सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी गतीने तपासचक्रे फिरवून गुरुवारी रात्री जरंडी गावातून तेजराव पाटील यास संशयावरून ताब्यात घेवून त्यास शुक्रवारी अटक केली होती.

तेजराव याने दिलेल्या कबुली जबाबावरून पाचोरा जि.जळगाव येथील नवल उर्फ पिंटू आबा राखुंड हा मोटारसायकल चोरी करतांना तेजराव च्या साथीदार असल्याचे निष्पन्न झाल्यावरून सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी तातडीने पाचोरयातून त्यास अटक करून सोमवारी दोघांना सिल्लोड येथील न्यायालयात हजर केले असता त्यांची गुरुवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे,ज्ञानेश्वर सरताळे,नारायण खोडे,रवींद्र तायडे,सादिक तडवी,आदि तपास करत आहे

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार