Crime News: साकीनाका पोलीस ठाणे येथे अजगरअली अल्लारखे शेख या ४८ वर्षीय व्यक्तीने संबंधित प्रकरणी तक्रारी दाखल केली
मुंबई : – सध्या महाराष्ट्रात अनैैति संबंधातून खुन झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच सकिनाकासरात प्रेमप्रकरणातून एका २२ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्ती नसीम शेख यांची बायको रुबिना शेख आणि भाचा मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी यांचे प्रेमसंबंध होते असा संशय नसीमला होता. म्हणून, नसीमने रुबिनाचा शारीरिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली. या सर्व त्रासाला कंटाळून रुबिनाने प्रियकर मोहमद फारुकी याच्या मदतीने पती नसीमचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी साकिनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकीनाका पोलीस ठाणे येथे अजगरअली अल्लारखे शेख या ४८ वर्षीय व्यक्तीने संबंधित प्रकरणी तक्रारी दाखल केली. सुन रूबीना शेख व तिचा प्रियकर साथीदार यांनी संगनमत करून २२ वर्षीय मुलगा नसीम शेख याला वैयक्तिक घरगुती भांडणावरून जिवे ठार मारून त्याचा मृतदेह घरातील लाकडी बेडमध्ये लपवून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर साकीनाका पोलिसांनी कलम ३०२, २०१, ३४ भादवि अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे, निगराणी पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक लोणकर तसेच पोलीस शिपाई बनसोडे यांनी दोन्ही आरोपींचा शोध घेतला.
तांत्रिक तपासाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून शोध घेत आरोपी रूबीना व तिचा प्रियकर मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली. रूबीना व सैफ यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्वक विचारणा केली. त्यावेळी, आरोपी रुबीनाने तिने व तिचा प्रियकर मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी याच्याशी संगनमत करुन नसीम शेख याचा गळा दाबुन खून केल्याचे सांगितले. त्यावरून दोन्हीही आरोपींना हत्येच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नसीम शेख हा रुबीनाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारिरीक व मानसिक छळ करत असल्याने छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासादरम्यान सांगितले.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.