Video Virel : भरसभेत महिला सरपंचाचा पारा चढला, उपसरपंचाच्या मुलाला मोबाईल फेकून मारला

Spread the love

Jalgaon Marathi news : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर गावात सुरू असलेल्या कामांमध्ये सरपंच विश्वासात घेत नाही या कारणावरून शाब्दिक वाद होऊन ग्रामपंचायत सरपंच महिलेने मोबाईल उपसरपंच महिलेच्या मुलाला मारून फेकल्याची घटना समोर आली आहे

महत्त्वाचे

  • ग्रामपंचायतच्या बैठकीत सरपंच महिलेने उपसरपंच महिलेच्या मुलाला मारून फेकला मोबाईल
  • मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यात राडा
  • मोबाईल मारून फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जळगाव : – गावात सुरू असलेल्या कामांमध्ये सरपंच विश्वासात घेत नाही या कारणावरून शाब्दिक वाद होऊन ग्रामपंचायत सरपंच महिलेने मोबाईल उपसरपंच महिलेच्या मुलाला मारून फेकल्याची घटना समोर आली आहे. महिलेने थेट मोबाईल मारून फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायत मध्ये बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी उपसरपंच व सरपंच अशा दोघांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्परविरुद्ध गुन्ह्याची मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सरपंच मागणीनूसार पैसै देत नाहीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडोदा ग्रामपंचायत येथे स्वप्ना संदीप खिरोळकर (वय ३०) या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. काल बुधवारी सरपंच आणि उपसरपंच सह ग्रामपंचायत सदस्यांचे ग्रामपंचायत कार्यालयात मासिक बैठक सुरू होती. या बैठकीत सरपंच पैशाच्या व्यवहाराबद्दल सांगत नाही, मागणी नुसार पैसे देत नाही या कारणावरून उपसरपंच रंजना हरिदास कोथळकर यांनी सरपंच स्वप्ना खिरोळकर यांच्याशी वाद घातला. या वादातून उपसरपंच महिलेने तिच्या दोघा मुलांना ग्रामपंचायत बोलावून घेतले हे मुलं मोबाईलमध्ये बैठकीची व्हिडिओ शूट करत असल्याने त्याचा राग आल्याने सरपंच यांनी त्यांच्या टेबलावर असलेला उपसरपंच यांचाच मोबाईल त्यांच्या मुलाला मारून फेकला.

शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली

दोघांमधील शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात उपसरपंच महिलेने सरपंच स्वप्न खिरोळकर यांना जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी उपसरपंच महिलेसह व तिच्या मुलांनाही सरपंच खीरोळकर यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हातातील गाडीची चावी सारख्या धारदार वस्तूने सरपंच खीरोळकर यांच्यावर वार केले. या घटनेत सरपंच खेरोळकर या जखमी झाल्या असून त्यांच्या तक्रारीवरून उपसरपंच रंजना हरिदास कोथळकर, प्रदीप हरिदास कोथळकर, विशाल हरिदास कोथळकर या तीन जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपसरपंच रंजना कोथळकर यांनीही सरपंच स्वप्न खिरोळकर यांच्या विरोधात मोबाईल फेकून तसेच मोबाईलचे नुकसान झाल्याची तक्रार दिली असून त्यावरून अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करत आहेत. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार