महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशन तर्फे कोरोना युद्धांचा गौरव.

Spread the love

कासोदा प्रतिनिधी – नुरुद्दीन मुल्लाजी

जळगाव:-महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सॉफ्ट टेनिस या राज्यस्तरीय स्पर्धेचे रविवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर समारोप झाले या समारोपीय समारंभात महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन जळगाव तर्फे शहरातील सामाजिक, राजकीय वैद्यकीय क्षेत्रातील ७ व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला.

क्रीडा संघटक फारूक शेख कोरोना योध्धा.

जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा कोविड सेंटरचे समन्वयक व जळगांव जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटना चे पदाधिकारी स्वराज्य क्रीडा संघटक मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त फारुख शेख यांनी मागील दोन वर्षात सुमारे १२०० कुटुंबियांना रेशन किटचे वाटप, ५७३९० लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार, covid-19 रुग्णांसाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर कोविंड हॉस्पिटल च्या माध्यमाने रुग्णांची सेवा, तसेच कोविड रुग्णांसाठी फक्त ७४९/- रुपयात रेमडीशिवर इंजेक्शन, ,१४००/- रुपयात चेस्ट सिटीस्कॅन व ४५०/- रुपयात कोविड रक्त तपासणी करून त्यांनी समाजामध्ये एक अष्टपैलू खेळाडू ची भूमिका निभावली त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन तर्फे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा उपमहापौर भुषण पाटील व सचिव दीपक आर्डे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सोनवणे सर व महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंची विशेष उपस्थिती होती यांचा सुद्धा झाला कोरोना योद्धा म्हणून गौरव

१) डॉक्टर सुयोग चौधरी एमडी मेडिसिन तथा न्यू मंगलमूर्ती हॉस्पिटलचे संचालक२) डॉक्टर मंदार पंडित एस सी एच व पंडित हॉस्पिटलचे संचालक ३)डॉक्टर श्रीमती योगिता बावस्कर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रोग प्रतिबंधक विभाग प्रमुख५) डॉ हिवरकर, एम डी अनेस्थेशीयन५) भरत कर्डिले लोक संघर्ष युवा चे अध्यक्ष६)अनिस शाह मुस्लिम कब्रस्तान कमिटीचे सह सचिव ज्यांनी १३७ covid-19 ने मृत पावलेल्यांचे आपल्या हस्ते ७×५ फूटा च्या खड्ड्यात दफनविधी केला. अशा या महान व्यक्तींना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले व त्यांच्याच हस्ते विजयी,उपविजयी, संघास व खेळाडूंना पारितोषिक देण्यात आली.

टीम झुंजार