लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा-अँड. शिवशंकर एस.आघाव…

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- महाराष्ट्राच्या निर्मिती मध्ये सिंहाचा वाटा असणारे आपल्या लेखणीच्या जोरावर क्रांतीची मशाल पेटवणारे, समाजाला शाहिरी माध्यमातून नव चित्र निर्माण करून जागृती करणारे,विविध कथा कादंबरी लोकनाट्य शायरी लिहिणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न देणे हे अत्यंत गरजेचे आहे.

भारतरत्न पुरस्कार पासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांच्या कार्याला व विचाराला दुर्लक्षित केल्यासारखे आहे.त्यामुळे भारत सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा साहित्याचा आणि चळवळीचा योगदानाचा विचार करून,त्याच्या कार्याचा गौरव हा त्यानां भारतरत्न पुरस्कार देऊन करावा.


यासाठी ॲड.शिवशंकर एस.आघाव(जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा/ मेहकर दिवाणी फौजदारी न्यायालय लोणार)हे भारत सरकार आणि संबंधित विभागास निवेदन देणार आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार