शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी शिक्षकाचा राजीनामा: 76 हजारांच्या पगारावर पाणी; पूर्णवेळ करणार पक्षाचे काम, ठाकरेंची घेणार भेट
pune school teacher resignation : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत “शिवसेना” या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे
इंदापूर :- महाराष्ट्रातील राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला खिंडार पडले आहे. मात्र अनेक जण शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलासाही मिळत आहे. त्यातच पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षकाने (Primary Teacher) उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.

दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत “शिवसेना” या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. दि. २७ जुलै २०२२ रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरातांच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले आहे.

कोण आहेत दीपक खरात?
दीपक खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ते कार्यरत होते. एक फेब्रुवारी २००२ पासून ते सेवेत आहेत. सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्र. 3 येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंतची सेवा २० वर्ष सहा महिने इतकी झालेली आहे.
नुकतेच शिंदे गटात गेलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचे घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेने प्रवेश केला. तर आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनीही शिवबंधन हाती बांधले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी राजीनामा देणारा बहुधा राज्यतील हा पहिलाच शिक्षक असावा. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची सध्या एकाच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा :
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






