महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई ; राजस्थान वरुन मुंबईला निघालेला कंटेनर अडवला आणि उघडताच फुटला घाम

Spread the love

चाळीसगाव :- सध्या महाराष्ट्रात गुटखा तस्करीचे प्रमाण वाढले आहे अश्यातच चाळीसगाव शहरतुन कंटेनरमध्ये गुटखा भरून जात असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने मालेगावरोड बायपासजवळ पथकाने सापळा रचला. यात त्या संशयास्पद कंटेनरची तपासणी केली असता यात १५१ पोते गुटखा भरल्याचे आढळून आले असून याचे मूल्य तब्बल ९२ लाख रूपये इतके असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर ट्रक आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

मोठी कारवाई : १५१ पोते गुटखा आढळला : ९२ लाखांचा गुटखा चाळीसगावात जप्त

राजस्थानातून चाळीसगावमार्गे मुंबई कडे जात असलेला, ९२ लाखांचा गुटखा भरलेला कंटेनर चाळीसगाव शहर पोलिसांनी ३० रोजी सायंकाळी ५ वाजता पकडला. शहरातील मालेगावरोड बायपासजवळ झालेल्या कारवाईत पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले.

मुंबईकडे गुटखा घेऊन कंटेनर जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक के.के. पाटील, सहाय्यक निरीक्षक विशाल टकले, सागर ढिकले, विनोद भोई, राकेश पाटील, पवन पाटील यांनी शिताफीने कंटेनतर ताब्यात घेतला. कंटनेरमध्ये ५ एसएचके कंपनीचा १५१ पोते गुटखा आढळला. याप्रकरणी कंटेनरसह पोलिसांनी गुटख्याचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यापूर्वी देखील चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी लाखो रूपयांचे गुटख्याचे कंटेनर पकडले आहेत. विषेश म्हणजे यापुर्वी पोलिसांनी पकडलेले कंटनेरही राजस्थान येथून चाळीसगावमार्गे मुंबईकडे गुटखा घेऊन जात होते. त्यामुळे गुटखा तस्करांनी राजस्थानहून मंुबईत गुटखा पाठवण्यासाठी चाळीसगावचा मार्ग निवडला. वारंवार कारवाईत गुटखा पकडला जातो, तरीही तस्करांच्या हालचाली थांबत नसल्याचे चित्र आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीसांपाठोपाठ चाळीसगाव शहर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे.

या पथकाने सापळा रचून केली कारवाई :-

ही कारवाई पोलिस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल टकले, सागर ढिकले, विनोद भोई, राकेश पाटील, पवन पाटील यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे परिसरातील गुटखा तस्कर धास्तावले आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार