WhatsApp Video Call Scam: इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp च्या माध्यमातून स्कॅमर्स अनेक यूजर्सची फसवणूक करत आहे. WhatsApp वर न्यूड कॉल करून यूजर्सला ब्लॅकमेल केले जात आहे. तसेच, पैशांची मागणी केली जाते.
नवी दिल्ली: – WhatsApp Video Call Scam: इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp च्या माध्यमातून अनेक यूजर्सची फसवणूक केली जात आहे. अनेकदा आपल्याला अनोळखी नंबरवर WhatsApp कॉल येत असतात. काही वेळा आपण अशा कॉल्सकडे दुर्लक्ष करतो. मात्र, वारंवार असे कॉल आल्यावर अखेर रिसिव्ह करतो. पण अनोळखी नंबरवरून आलेले व्हिडिओ कॉल रिसिव्ह करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला एक न्यूड मुलगी असते. जोपर्यंत तुम्ही कॉल डिसकनेक्ट करण्याचा प्रयत्न करता, तोपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो. हा व्हिडिओ तुम्हाला WhatsApp नंबर अथवा फेसबुकवर कथित पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने पाठवला जातो. स्कॅमर्स अशाप्रकारे लोकांना फसवूण ब्लॅकमेल करतात व त्यांच्याकडून पैशांची मागणी करत असल्याचे समोर आले आहे.

अनेकांसोबत घडली आहे ही घटना
अनेकजण नाव खराब होण्याच्या भितीने याला बळी पडून पैसे देतात. अशाप्रकारच्या घटनांची चर्चा देखील होत नाही. स्कॅमर्स लोकांच्या याच भितीचा फायदा उचलतात. अशीच एक घटना गेल्यावर्षीच्या अखेरीस समोर आली होती. दिल्ली विद्यापीठातील ३५ वर्षीय प्राध्यापकाला फेसबुक मेसेंजरवर व्हिडिओ कॉल आला होता. प्राध्यापकाला काही कळण्याआधीच स्कॅमर्सने त्यांचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला व त्यानंतर २० हजार रुपयांची मागणी केली. स्कॅमर्सने हा व्हिडिओ पोस्ट करण्याची धमकी देखील दिली. मात्र, प्राध्यापकाने अकाउंट घाईघाईत डिलीट केले. त्यानंतर प्राध्यापकासोबत काही घडले नाही.
सायबर एक्सपर्ट्सनुसार, याप्रकारच्या व्हिडिओ कॉल्स आणि ब्लॅकमेलिंग मागे संपूर्ण गँग आहे. या लोकांचे कामच कॉल करून व्हिडिओ बनवणे व त्यानंतर ब्लॅकमेल करून पैसे लुटणे आहे. करोना काळात देखील अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशा घटनेपासून वाचण्यासाठी अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स रिसिव्ह करू नये. तसेच, नकळत तुम्ही अशा जाळ्यात अडकल्यास ब्लॅकमेलिंगसाठी येणाऱ्या कॉलकडे दुर्लक्ष करून त्वरित सायबर पोलिसांना याची माहिती द्या. याशिवाय, अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास ट्रूकॉलर सारख्या प्लॅटफॉर्मवर नक्की तपासा.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






