पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत ईडीच्या ताब्यात

Spread the love

ED at Sanjay Raut’s Home Live : ईडीकडून संजय राऊतांची सहा तासाहून अधिक काळ चौकशी ; संजय राऊत ईडीच्या ताब्यात

पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत यांची मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर त्यांना ईडच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलीक यांच्या पाठोपाठ मविआतील तिसर्‍या मोठ्या नेत्याला ईडीने गजाआड केल्याने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Ed raids Shivsena Leader Sanjay Raut’s Residence : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. आता या चौकशीला सहा तासापेक्षा अधिक काळ झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात मनीलॉर्डिंग झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे.

त्यामुळे संजय राऊत यांच्यावर अटकेची टागंती तलवार कायम आहे. दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर शिवेसेनेच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. तर या कारवाईमुळे आम्ही आनंदी असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाने दिली आहे. भाजपानेदेखील या कारवाईवरून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

टीम झुंजार