सरस्वती शैक्षणीक सांस्कृतिक विकास मंडळ विवरे संचलित, सरस्वती इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये कारगील विजय दिवस संपन्न झाला.

Spread the love


निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- कारगीलकारगील विजय दिवस या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी शाळेचे प्रशासक श्री महेंद्र दयाराम पाटील ,शाळेच्या सचिव सौ संगीता महेंद्र पाटील आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली .कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात.

विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे. २६ जुलै हा कारगिल दिन म्हणून साजरा होतो. कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या शूर अधिकाऱ्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘कारगिल विजय दिवस’ देशभरात साजरा करण्यात येतो. याच दिवशी भारतीय सैन्याच्या जवानांनी कारगिलमध्ये विपरित परिस्थितीत शत्रूसैन्याला नामोहरम केले. कारगिलच्या शहिदांचे नागरिक सन्मानाने स्मरण करण्याबरोबरच, देशातील सैनिकांचा आदर करण्याचा हा दिवस असतो. देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची व बलिदानाची आठवण करून आपली देशभक्ती जागृत करण्यासाठी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देशभरात करण्यात येत असते.

भारतीय सैन्याचे देशप्रेम, स्वयंशिस्त, श्रद्धा, शारीरिक व मानसिक सामर्थ्य, तसेच वीरवृत्ती उल्लेखनीय असते आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपण देशहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे. सैनिकांनी केलेल्या त्यागाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर करून सर्व वीर जवानांना मानवंदना दिली. शाळेचे पर्यवेक्षक श्री मिलिंद दोडके यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विजय लोखंडे आणि कार्यक्रमाची सांगता शिक्षक नरेंद्र पाटील यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार