नायब तहसीलदार शशिकांत जनार्दन इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना अटक
भुसावळ जि. जळगाव: – सध्या महाराष्ट्रात बनावट दस्तऐवज तयार करण्याच्या घटनान मध्ये वाढ झाली आहे अश्यातच भुुसाव शहरातील तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी व शिक्के तयार करुन भूखंडाच्या विक्रीस परस्पर परवानगी दिल्याचा प्रकार भुसावळात उघडकीस आला आहे. या प्रकरणी शासनाची फसवणूक केल्याने नायब तहसीलदार शशिकांत जनार्दन इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना अटक करण्यात आली. रविवारी रात्री भुसावळ शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी १० जणांना बेकायदेशीर प्लॉट विक्री केली. याप्रकरणी वसुली अधिकाऱ्यासह प्लॉट घेणारे १० जण अशा एकूण ११ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याबाबत नायब तहसीलदार शोभा घुले यांनी फिर्याद दिली होती.
त्यावरुन रविवारी ही कारवाई करण्यात आली. या फसवणूक प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आणखी काय सत्य बाहेर येतं, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
हे वाचलंत का ?
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि.२१ नोहेंबर २०२४