प्रतिनिधी – संतोष कदम.
औरंगाबाद :- ( गंगापूर) – आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक व तालुका कार्यकर्त्यांचा गंगापूर येथे मेळावा आयोजित करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी गंगापूर तालुका कार्यकारिणी सह तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी यांची महत्वाची बैठक तालुकाध्यक्ष शेख युनुस पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गंगापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोणकोणते जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण लढवुण जिंकून आणता येतील त्याचं प्रमाणे पक्षाच्या जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट यांचा दौराही पुढील आठवड्यात गंगापूर येथे होण्याची शक्यता गृहीत धरून त्यावेळी तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्याबाबत सुध्दा कार्यकर्ते यांचे मत जाणून घेण्यात आले या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामनाथ शिराळे मामा,सागर भवार उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर म्हणाले गंगापूर तालुक्यात सध्या आपल्या पक्षात इनकमिग सुरू झाले असून विविध ग्रामपंचायत सदस्य यांनी या अगोदर पक्षात प्रवेश केला असुन आज आपल्या तालुक्यातील वाळुंज महानगर येथील ओबीसी नेते तेली सेनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग चोथे यांनी आपल्या संय्ख कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला अश्याच पद्धतीने कार्यकत्यांनी सक्रिय राहुन तालुक्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या निमित्ताने पक्षांचे खाते उघडले गेले पाहिजे असे विचार व्यक्त केले.
सर्वंच कार्यकत्यांनी दाद देत गंगापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे खाते उघडण्याचा निश्चय बोलुन दाखवला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव, अमोल केदारे , सचिन भुजंग तालुका उपाध्यक्ष सुभान शहा उस्मान शहा,अमोल जाधव, दिलीप आराक, भाऊसाहेब गायकवाड,सईदबाबा पठाण, शेख नबी पटेल, दत्ता गायकवाड, आदींनी परिश्रम घेतले बैठकीचे प्रस्तावित तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग यांनी केले तर तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी आभार मानले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






