आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा पिंप्री खु येथे बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर आनाभाऊं साठे यांच्या विचारांना उजाळा

Spread the love

महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घ्या – श्री विनोद चौधरी.

धरणगाव प्रतिनिधी

पिंप्री खु :– येथील आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा पिंप्री खु येथे बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर आनाभाऊं साठे यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला . लोकमान्य टिळक यांचे कार्य व इंग्रजी सत्ते विरोधात संघर्ष तसेच मराठा ,व केसरी या वर्तमानपत्र मधून केलेली जागृती व भारतीयांचा स्वातंत्र संघर्ष आदी बाबीवर प्रकाश झोत टाकण्यात आला. तसेच लोकशाहीर आणाभाऊ साठे यांच्या अन्याया विरोधात असलेल्या संघर्ष व आपल्या कादंबरी ,कथा यातून आलेल्या समाज उन्नती च्या लेखनात नाटके , पोवाडे , कथा , लोककथा आदींच्या माध्यमातून झालेल्या वैचारिक क्रांतीला उजाळा देण्यात आला . विद्यार्थी व शिक्षक यांनी आपल्या मनोगतात दोघा महापुरुषांच्या विविध कार्याला नमन केले.

प्रसंगी वेदमाता गायत्री बहू. संस्था चे सचिव विनोद चौधरी हे कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी होते तसेच मुख्याध्यापिका सौ व्ही एम चौधरी , उपशिक्षक आर आर पावरा , एस के शिंदे , आर एस पाटील ,जितेंद्र पाटील , विजय साळवे , मनिषा पाटील ,भावना भाट , दीपिका जाधव , शिक्षकेतर कर्मचारी सौरभ देसले , सुदर्शन चव्हाण , अविनाश पाटील, आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले तर आभार शरीफ पटेल यांनी मानलेेेेे

हे वाचलंत का ?

टीम झुंजार