जळगाव :- सध्या महाराष्ट्रात वयोवृद्ध आणि धनिक प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवून वाटेत निर्मनुष्य जागी त्यांना लुटण्याचे अनेक प्रकार आपण ऐकले आहेत. तसेच पोलिसांनी उघड देखील केले आहेत. रिक्षा चालकाच्या भुमिकेत राहून आपल्याच गुन्हेगार मित्रांना प्रवाशाच्या रुपात आधीच बसवून नंतर बसलेल्या प्रवाशाची वाटेत लुटमार करण्याची पद्धत काही गुन्हेगारांनी अवलंबली आहे. एका नाशिकच्या ७८ वर्षीय वयोवृद्धाच्या बाबतीत असाच प्रकार जळगाव शहरात घडला. दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपींना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एमआयडीसी पोलिसांनी चार पैकी दोन चोरट्यांना रविवारी (31 जुलै) अटक केली.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तमराव नामदेव वाघ (वय 78) हे जळगावातील संत गाडगेबाबा चौकात राहणाऱ्या मुलीस भेटण्यासाठी 30 जुलै रोजी रात्री आले होते. रेल्वेस्थानकावरुन ते एका रिक्षेत बसले. या रिक्षात आगोदर दोन जण बसले होते. रिक्षा इच्छादेवी चौक, डी-मार्ट पाईंटवरून संत गाडगेबाबा चौक न जात थेट मेहरूण तलावाजवळील एका गल्लीतील अंधारात घेवून गेला. त्यावेळी तिन जणांनी अचानक उत्तमराव वाघ यांच्या मानेला चाकू लावून धाक दाखवला. त्यांच्या जवळील मोबाइल व 12 हजार रुपयांची रोकड घेऊन पळून गेले.
सीसीटीव्ही फुटेज तपासले
या प्रकरणी वाघ यांनी 31 जुलै रोजी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, अतुल वंजारी, सुधीर साळवे, इमरान सय्यद, मुदस्सर काझी, किशोर पाटील, छगन तायडे यांनी वाघ यांन सोबत घेऊन संपूर्ण मार्गाची तपासणी केली. वाघ यांनी सांगीतल्यानुसार मार्गावरील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात एका रिक्षेवर संशय बळावला. संबधित रिक्षा सराईत गुन्हेगार आकाश जोशी या भाड्याने घेऊन चालवत असल्याची माहिती मिळताच पथकाने रविवारी आकाश उर्फ चोक्या अरुण जोशी व लक्ष्मण उर्फ चिंट्या खेमचंद जोशी या दोघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
रिक्षेत माहितीचे स्टीकर नव्हते
जिल्ह्यातील सर्व रिक्षांमध्ये रिक्षाचालक, मालक यांचे नाव, पत्ता व मोबाइल नंबर, रिक्षा क्रमांक आदी माहिती असल्याचे स्टीकर्स चिकटवण्याची मोहिम पोलिस दलाने सुरू केली होती. दरम्यान, अद्यापही निम्म्यापेक्षा जास्त रिक्षांमध्ये हे स्टीकर्स लावलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना रिक्षाचालक, मालकाची माहिती मिळत नाही. परिणामी आकाश सारख्या काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांना लुटल्याच्या घटना घडत आहेत.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.