नशिराबाद प्रतिनिधी (सुनिल महाजन)
न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात नर्सरी विद्यार्थांना गणवेश वाटप व लोकमान्य टिळक पुण्यतिथि व अण्णा भाऊ साठे जयंती साजरी. लोकमान्य टिळक पुण्यतिथि व अण्णा भाऊ साठे जयंती चे आऊचीत्य साधून शाळेतली नर्सरी विद्यार्थांना शाळे मार्फत गणवेश वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष जनार्दन माळी होते तर मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ विकास चौधरी, कार्याध्यक्ष योगेश पाटील, संचालक डॉ संदीप महाजन व मुख्याध्यापक प्रविण महाजन उपस्थित होते.
सर्वप्रथम लोकमान्य टिळक पुण्यतिथि व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन दिप प्रज्वलन करण्यात आले. तदनंतर सर्व नर्सरी विद्यार्थांना शाळेमार्फत गणवेश वाटप करण्यात आले तसेच या कार्यक्रमात गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला यात प्रथम योजना बर्हाटे, द्वितीय ऋषी पाटिल व तृतीय ईश्वरी करुले यांना प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आली यात प्राथमिक विभागाचे २५ विद्यार्थांनी सहभाग नोंदविला व सर्वांनी उत्तमरीत्या लोकमान्य टिळकांच्या जीवनातील बालपणाच्या गोष्टी सांगितल्या.तर शिक्षक भाषणात उपशिक्षिका लीना पाटील यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनाबद्दल इतिहास सांगितला तर शितल चावरे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्या बद्दल माहिती सांगितली.
तर अध्यक्षीय भाषणात जनार्दन माळी यांनी विद्यार्थांना आपण सर्वांनी लोकमान्य टिळकांचा आदर्श आपल्या जीवनात घ्यायला हवे असे सांगितले.या कार्यक्रमाचे नियोजन वंदना चौधरी यांनी केले तर सूत्र संचालन तुषार रंधे व आभार ज्योती बारी यांनी केले.या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
आपण या बातम्या वाचल्यात का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






