मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण शैक्षिक आगाज दिल्ली तर्फे सन्मानित.

Spread the love

प्रतिनिधी । एरंडोल :-एरंडोल लोककला आणि संस्कृतीचा शिक्षणात समावेश करण्यावर शैक्षिक आगाज च्या 14 राज्यातील 50 हून अधिक शिक्षकांच्या चमूने 31 डिसेंबर 2021 ते 5 जानेवारी 2022 या कालावधीत राजस्थानला भेट दिली यामध्ये राजस्थान विद्यापीठ जयपूर येथे प्रोफेसर बीएस नाठीया, चेअर पर्सन एआयसीटीई, नवी दिल्ली संस्थेचे माजी अध्यक्ष आणि भूविज्ञान विभागाचे प्राध्यापक एम के पंडित, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक जी पी सिंग आणि युधिष्ठिर सिंह यांच्यासह राजस्थानी लोक कला आणि संस्कृतीचे महत्त्व भारतीय शैक्षिक आगाजची उद्दिष्टे आणि कार्य आणि शैक्षणिक सुरुवात यावर चर्चा करण्यात आली .

शैक्षिक आगाज दिल्ली यांच्यावतीने मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण यांना सन्मानित करतांना प्रा. एम के पंडित, प्रा. जी पी सिंग आणि युधिष्ठिर सिंह.

शैक्षिक आगाज च्या सर्व साथीदारांना त्यांच्या शैक्षिक कार्याबद्दल गौरविण्यात आले उदयपूर येथील उदयपूर सेंटर ऑफ कल्चरल रिसोर्स अँड ट्रेनिंग या ठिकाणी तेथील प्रमुख सी सी आर टी डायरेक्टर मिस्टर दिनेश कोठारी आणि भारतीय लोककला मंडळ चे डायरेक्टर लईक हुसेन यांच्या यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले कठपुतळी चा इतिहास तसेच ते बनवण्याचे प्रशिक्षण दिले या ठिकाणी ट्रॉफी व सी आर टी चे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले भारतातील 14 राज्यातील आलेल्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांचे ट्रॉफी व सी सी आर टी चे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

सन्मानित झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील अंजुषा चव्हाण, अनिता पाटील, क्षमा साळी, नाना पाटील, शोभा भालसिंग आदी शिक्षकांचा समावेश होता शैक्षिक आगाज भविष्यकाळातही अशाच प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणार आहेत आणि भविष्यातही समाजासाठी भारतीय संस्कृती व शिक्षणासाठी कटिबद्ध राहणार आहेफोटो ओळ :- शैक्षिक आगाज दिल्ली यांच्यावतीने मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण यांना सन्मानित करतांना प्रा. एम के पंडित, प्रा. जी पी सिंग आणि युधिष्ठिर सिंह

टीम झुंजार