रावेर :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच रावेर तालुक्यातील कर्जोत येथील दोन सख्खे भाऊ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या भीषण अपघातात गरिब कुटुंबावर काळाचा घाला आल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत रावेर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
सुनिल नारायण हरिजन (वय ३५) व अनिल नारायण हरिजन ( वय २३) असे मयत झालेल्या दोघा भाऊंचे नाव आहे. हरिजन हे कुटुंब खंडवा (मध्य प्रदेश ) येथील असून रावेर तालुक्यातील कर्जोत नजिक कामानिमित्त राहत होते. अत्यंत अठरा विश्वदारिद्र असणार्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. हा भीषण अपघात अंकलेश्वर ते बर्हाणपूर महामार्गावर आज दुपारी घडला. यात दोघे मजूरीचे काम करणारे सख्खे भाऊ ठार झाले असून या दोघी भाऊंचे लग्न झाले होते. अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, अपघाताची माहीती मिळताच पोलिस ग्रामीण रुग्णालयात पोहचले ससून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तर या भीषण अपघातात गरिब कुटुंबावर काळाचा घाला आल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






