सोयगाव । प्रतिनिधी दि.०२….शेतातील निंदनी करून ठेवलेल्या तणाचे पंजे फेकण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली.ऐन नागपंचमी च्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे निंबायती गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कपाशीच्या शेतात निंदनी करून ठेवलेल्या तणाचे पंजे फेकण्यासाठी सोमवारी पहाटे शेतात गेलेल्या शेतकरी गफूर तुराब तडवी(वय ६३) यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.सर्पदंश होताच त्यांना सोमवारी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले परंतु अखेरीस त्यांची सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली नागपंचमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे निंबायती गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
निंबायती शिवारात गट क्र-82 मध्ये शेतात निंदनी करून ठेवलेल्या तणाची पंजे उचलण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याला निंदनीच्या पुंज्यातून निघालेल्या सापाने त्यांच्या हाताला व पायाला दंश करून गंभीर जखमी केले दरम्यान त्यांना तातडीने उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्यांची सोमवारी सायंकाळी प्राणज्योत मावळली.
त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले,पाच मुली,सुना नातवंडे असा परिवार असून माजी सरपंच शमा तडवी यांचे ते वडील होते.ऐन नागपंचमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे निंबायती गावात शोककळा पसरली होती.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






