पाचोरा :- सध्या महाराष्ट्रात मारहाण झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे लहान मुलीला मारल्याची घटना समोर आली आहे. दोन वर्षाच्या मुलीच्या आईसोबत शेजारील महिलेचा वाद होता. ती मुलगी दारात खेळण्यासाठी आल्याने जुन्या वादाचा त्या मुलीवर राग काढत अमानूष मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये ती चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शेजारील महिलेने अमानुष दोन वर्षांच्या लहान मुलीला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सदर घटना दुसऱ्या दिवशी समोर आल्यानंतर संबंधित महिले विरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवानी मोहित बडगुजर असे मारहाण झालेल्या मुलीचे नाव आहे.
शिवानीच्या शरीरावरील जखमा पाहून तिला अमानुषपणे मारहाण झाल्याची मुलीच्या आईच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती शेजारी विचारले असता संबंधीत महिलेने उडवा उडवीची उत्तरे दिली. या निर्दयी शेजारीण बाईने अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकलीला जमिनीवर लोळाऊन चपलीने व काठीने बेदम मारहाण केली असल्याचे काहींनी चिमुकलीच्या घरी समजल्यावर याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
दरम्यान त्या मुलीला मारताना मुलगी कळवळत असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा तीव्र निषेध पिंपळगाव हरे येथील जनतेतून होत आहे. सदर महिलेचे मुलीच्या आईसोबत जुने वाद होते असे सांगितले जात आहे. त्याच जुन्या वादाचा राग मनात ठेवून अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकली बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे.
या महिलेने निर्दयीपणे निष्पाप मुलीला मारहाण केली असून ही मुलगी तिथे जागेवर ओक्साबोक्शी रडतानाही चप्पलने व काठीने मारहाण केली. याप्रकरणी पिंपळगाव हरे पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचलंत का ?
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम