मुंबई : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच शिवसेनेचे नवनियुक्त ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे( kedar fighe ) यांच्या विरोधात एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे हे ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेने केदार दिघे यांची ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशन मध्ये केदार दिघे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे आणि त्यांचा मित्र अशा दोन व्यक्तींविरोधात बलात्कार आणि धमकी दिलेल्या प्रकरणात पीडित महिले कडून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे.
केदार दिघे यांना शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्यामध्ये लढा देण्याकरिता जिल्हा अध्यक्ष पदावर निवड केल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे आणि केदार दिघे यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. आता त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने येत्या काळामध्ये केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे .
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.