झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- पळासदड (ता एरंडोल) येथील अंजनी नदीवर बांधण्यात आलेल्या अंजनी मध्यम प्रकल्पाच्या कामासाठी सुमारे 232 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.
प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे प्रकल्पाची सिंचन क्षमता पूर्ण होऊन सुमारे 2 हजार 831 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
याबाबत माहिती अशी की अंजनी मध्यम प्रकल्पाचे वाढीव उंचीसह काम 2008 मध्ये पूर्ण झाले होते. प्रकल्प पूर्ण होऊन त्यामध्ये जलसाठा देखील करण्यात येत होता मात्र सिंचनासाठी वितरण व्यवस्था(पाटचाऱ्या ) नसल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या लाभ मिळत नव्हता. आमदार चिमणराव पाटील यांनी प्रकल्पातील जलसाठ्याच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ व्हावा म्हणून वितरण व्यवस्थेसाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होते. प्रकल्पाच्या कामासाठी 231 कोटी 82 लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.
आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सुधारित प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केवळ दोनच दिवसात सुधारित 231 कोटी 82 लाख प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
शासनाने सदर प्रस्तावास मंजुरी दिल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणाली द्वारे शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. मुळे शेतकऱ्यांची क्षेत्र संपादन करण्याची गरज नाही बंदिस्त वितरक प्रणालीद्वारे एरंडोल तालुक्यातील सुमारे 2 हजार 68 हेक्टर आणि धरणगाव तालुक्यातील 762 हेक्टर असे 2 हजार 681 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पातील जलसाठ्याचा सिंचनासाठी उपयोग होणार असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच पुढील पंधरा दिवसात पद्मालय साठवण तलाव व उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असून या प्रस्तावास देखील मंजुरी मिळणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






