पारोळा शहरासह ग्रामीण भागात राजमाता जिजाऊ व विवेकानंद जयंती साजरी.

Spread the love

प्रतिनिधी पारोळा :-येथील न्यू पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय व्यंकटेश नगर या शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली.

शासन परिपत्रकानुसार जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा या अभियाना अंतर्गत शाळेने वकृत्व स्पर्धा ,वेशभूषा स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,निबंध स्पर्धा, गीत गायन स्पर्धा ,चे आयोजन करण्यात आले. कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर काही स्पर्धा व्हाट्सअप व ऑनलाइनच्या माध्यमातून घेण्यात आल्या यात इयत्ता आठवी ते दहावी या गटामध्ये भूमिका गायकवाड, निकिता पाटील, कल्पेश पाटील धनश्री सोनवणे यांनी तर इयत्ता पाचवी ते सातवी या गटात राजवर्धन पाटील ,राज पगारे ,शुभम विसावे यांनी सहभाग नोंदवला .

यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले यशस्वी विद्यार्थी व सहभागी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक डॉ शांताराम दाजीबा पाटील यांनी अभिनंदन केले .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डी बी पाटील यांनी भूषवले व्यासपीठावर बी एच पाटील,B एस आर पाटील ,सी एम पाटील, शैलेश पाटील ,उमेश विसावे व गणेश पाटील उपस्थित होते. संकेत पाटील व नयन पाटील या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले भागवत सोनवणे यांनी सहकार्य

बालाजी विद्यालयात सावित्रीबाई जिजाऊ जयंती महोत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरा

श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयात सावित्री बाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ यांच्या जयंती पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले बालिका दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यात चित्रकला स्पर्धा गायन स्पर्धा नाटिका सादरीकरण असे विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश करोडपती सचिव सचिन बडगुजर विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील विजय बडगुजर ,स्वाती बलखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी उमेश करोडपती यांनी विद्यार्थ्यांचे कलागुण पाहून अभिनंदन केले तसेच हेमंतकुमार पाटील यांनी सावित्रीबाई फुले ते राजमाता जिजाऊ जयंती पर्यंत विविध उपक्रम बाबत माहिती दिली राजमाता जिजाऊ जयंती दिना निमित्ताने विद्यालयातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनी हिंदवी सुनील पाटील हिने आपल्या एक पात्री अभिनयाने जिजाऊ जिजामाता यांच्या वेशभूषा करून सध्याच्या काळातील शिवराय घडवणारी जिजाऊ कशी असावी ही आजच्या काळाची गरज ओळखून आपल्या एकपात्री अभिनयाने उपस्थित सर्व प्रमुख अतिथी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजीत कुमार कंसारा आभार रेखा बडगुजर यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मराठा सेवा संघ व छावा संघटने कडून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निम्मित प्रतिमा पूजन.

येथे मराठा सेवा संघ व छावा संघटने कडून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निम्मित प्रतिमा पूजन करण्यात आले. गाव होळी चौकात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील,उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान ,प्रा शैलेंश पाटील,ऍड तुषार पाटील,छावा ता अध्यक्ष विजय पाटील,अभियंता व्ही एम पाटील,गुणवंत पाटील मराठा सेवा संघाचे संदीप पाटील,विक्रांत पाटील ,उमप सर ,प्रा जे बी पाटील ,संदीप बोरसे ,मनीष अग्रवाल सावंत मॅडम ,राजू कासार,अनु महाजन ,प्रा विकास सोनवणे ,अन्नपूर्णा पाटील रावसाहेब भोसले,अभय पाटील, यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी घोषणा देण्यात आल्या तर प्रा शैलेश पाटील यांनी दोन्ही महापुरुषांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले आभार विजय पाटील यांनी मानले.

तालुक्यातील म्हसवे माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

म्हसवे माध्यमिक विद्यालयात राजमाता जीजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापिका सरिता देशमुख यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियानांतर्गत एकपात्री प्रयोग व ऑनलाईन वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. दि. १०/१/२०२२ महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार covid-19 च्या प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन कार्यक्रमात सहभाग नोंदवला. .

त्यात इयत्ता ७वी चीविद्यार्थीनीं चेतना राकेश बोरसे ,इ.७वी रागिनी अरुण कोळी, इ.८वी.मोनिका किशोर पाटील यांनी वकृत्व सादर केले. तसेच इ.८वी ची विद्यार्थिनी रुतिका यशवंत सुतार मी सावित्री बोलते. एकपात्री प्रयोग सादर केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक जितेंद्र पवार, शरद पाटील, शोभा बेहेरे, ललिता सूर्यवंशी, वैशाली पाटील, दिपक पाटील, विजय महाजन, गोरख पाटील, उमाकांत पाटील यांनी परिश्रम घेतले.

टीम झुंजार