सावित्रीबाई फुले व जिजामाता जयंती निमित्त लोकस्वराज्य ग्रामविकास प्रतिष्ठान तर्फे हस्तकला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

Spread the love

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप करमाळा: दि. १२/ करमाळा तालुक्यातील जेऊर येथे राज्यमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त हस्तकला स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला. जेऊर ग्रामीण भागातील महिलांच्या कला कौशल्याला वाव मिळण्याच्या व रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हस्तकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ज्योती कदम ( प्रांताधिकारी माढा विभाग) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन माढा विभागाच्या प्रांत अधिकारी ज्योती कदम यांनी केले. त्या जिजामाता जयंती व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त लोकस्वराज ग्रामविकास प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेल्या महिलांच्या हस्तकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभात बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोक स्वराज्य ग्रामविकास प्रतिष्ठान च्या अध्यक्ष अ़ॅड. सविता शिंदे यांनी केले त्यांनी महिलांच्या हस्तकला स्पर्धा आयोजित करण्या पाठीमागची भूमिका विशद केली ग्रामीण भागातील महिलांमधील अनेक कला असतात परंतु त्यांना वाव मिळत नाही व त्याचा व्यावसायिक उपयोग करण्याच्या संधी व मार्गदर्शन यांचाही अभाव असतो त्यामुळे अशा महिलांना या माध्यमातून व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अ़ॅड. सविता शिंदे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सुनीता जोशी या होत्या त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच जिजाऊंचा आदर्श व प्रेरणा घेऊन महिलांनी प्रगती करावी असे सांगितले. तसेच महिलांनी कलांचा माध्यमातून स्वावलंबी होण्याची गरज असल्याचेही डॉ. दोशी म्हणाल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनीता कांबळे होत्या. हस्तकला स्पर्धेत प्रथम क्रमांक योगिता देशमुख, द्वितीय क्रमांक सुप्रिया तनपुरे,व तृतीय क्रमांक कोमल गुरव यांना मिळाला व उत्तेजनार्थ बक्षीस पूजा मुटेकर यांना मिळाले. हस्तकला स्पर्धेच्या परीक्षक राजकुमार पाटील बंसरी सूर्यवंशी, वैशाली शिंगाडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कर्णवर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन अ‌ॅड. सविता शिंदे (अध्यक्षा), विजया कर्णवर, माया कदम, पुष्पा करचे, नलिनी जाधव चौरे, डॉ. विद्या दुरंदे, गायत्री कुलकर्णी, रूपाली बिराजदार, नंदिनी लुंगारे, वैशाली घोडके, राजश्री कांबळे, मनीषा साळवे, आशा चांदणे, इ. महिलांनी परिश्रम घेतले.

टीम झुंजार