युवा मोर्चाचे लासुर्णे ग्रामपंचायतीला निवेदन..

Spread the love

प्रतिनिधी – संतोष कदम.


लासुर्णे :- ( ता. इंदापूर ) भारत देशाच्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. दि. 13 ऑगस्ट ते दि. 15 ऑगस्ट या दरम्यान शासनाचा “हर घर तिरंगा”हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने “हर घर तिरंगा”या अभियान अंतर्गत प्रत्येक घरावरती तिरंगा फडकवला जाणार आहे. पण गावातील, शहरातील, नगरातील, शासकीय इमारत यांच्या वरती देशाचा तिरंगा झेंडा 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 13 ते 15 ऑगस्टपर्यंत आकाशात फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे.


ग्रामपंचायत लासुर्णे येथील शासकीय कार्यालय यांच्यासमोर ध्वजस्तंभ नाहीत. त्याकरिता ग्रामपंचायत लासुर्णे यांच्याकडे युवा मोर्चा तसेच इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा संघटक ॲड. मंगेश प्रभाकर लोंढे, सिद्दी जगताप, शुभम सुर्वे, सागर भोसले, अमोल खोमणे, यश खोमणे, हृदयनाथ लोंढे, सचिन यादव यांनी पोस्ट ऑफिस, पशुवैद्यकीय दवाखाना, बीएसएनएल ऑफिस, MSEB कार्यालय यांच्यासमोर दि. 10 /8 /2022 पर्यंत ध्वजस्तंभ बसवावा त्याकरिता निवेदन दिले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार