स्वा.सै.प.ध.थेपडे विद्यालय म्हसावद येथे शिक्षक पालक सहविचार सभा सम्पन्न

Spread the love

म्हासावद :- येथील थेपडे विद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या नुसार सभा संपन्न झाली अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.बी. सोनार सर हे होते तसेच या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक श्री.जी.डी.बच्छाव सर पर्यवेक्षक श्री.एस.के.भंगाळे सर तसेच जेष्ठ नागरिक युवराज अण्णा ,शिक्षक पालक संघ सदस्य श्री.अभिलाष वामन पाटील व ग्रामपंचायत सदस्य श्री.बापू कौतिक धनगर आणि समस्त पालक व शिक्षक वृंद हे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची धुरा श्री.एस.जे.पवार सर यांनी सांभाळली .

सभेच्या सुरवातीला ISRO येथे जाऊन आलेल्या कु. जानव्ही रवींद्र पाटील व दहावीला प्रथम आलेली कु. प्रेक्षा प्रविण शिरोळे या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीएस के भंगाळे सर सभेचे प्रास्ताविक केले. श्री बच्छाव सरांनी कार्यक्रमाला संबोधित करताना शालेय कामकाजाविषयी ची व पालकांना विद्यार्थ्यांसंबंधीचे अतिशय महत्त्वाचे मौलिक असे विचार मांडले. येणाऱ्या काळात आपल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनामध्ये होणारा अमुलाग्र बदल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या सभेत पालकांनी ही विचार मांडले व त्यासंबंधी त्यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली‌.

शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. के.पी.पाटील सर यांनी केले याप्रमाणे आज रोजी ची शिक्षक पालक सहविचार सभा उत्साहानं संपन्न झाली. सभेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

हे वाचलंय का ?

टीम झुंजार