वाकोद, ता. जामनेर :- सध्या महाराष्ट्रात गुटखा तस्करीचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाकोद जवळ दिनांक 2 रोजी साडे पाच वाजेच्या दरम्यान संशयित बोलेरो पिक अप गाडी आढळून आली असता तब्बल 24 तासानंतर पोलीसात गाडी चालक व् गाडी मालक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडी मधून तब्बल 14 लक्ष 60 हजार रु किमतीचा अवैध गुटखा मुद्देमालासह पहर पोलीस ईश्वर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादि वरुण गुन्हा दाखल करण्यात आला.
गाडी मधे 7 लाख 68 हजार रु किमतीचा राजविलास गुटखा ते 1 लक्ष 92 हजार रु किमितिचा जाफरानी जर्दा व् पाच लाख रु किमतीची बोलेरो पिक अप गाडी ऐसा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामागे मोठे रैकेट असण्याचा संशय आहे.
सविस्तर वृत्त असे की जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान मंगळवार रोजी संध्याकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान पिंपळगांव पळसखेडा फाट्या जवळ जळगाव वाहतूक पोलिसांनी बोलेरो गाड़ी क्र. (एम. एच. १९ सी. वाय. ६८८१) अडवून चौकशी केली असता चालक संशयास्पद वागणूक आढळून आली. गाड़ी काय माल आहे असे विचारताच वाहन चालकाने तेथून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठलाग करती वाहतूक पोलिस ही मागे गाड़ी घेऊन निघाले बेदरकारपणे दोघांनी वाहने भर रस्त्यावर चलविल्याचे प्रत्येक्ष दर्शीनी सांगितले.
धोकादायक पणे पिकअप च्या चालकाने यू टर्न घेऊन महामार्गावर गाड़ी लावून शेतातून मार्ग काढीत पळ काढला. सुरवातीला ट्रैफिक पोलिसांनी त्यात चटाई असल्याचे पत्रकारांना सांगितले.त्यांनी स्थानिक पहुर पो.स्टे. चे पोलिस अधिकारी घटना स्थळी बोलावून घेतले असता जागेवर पंचनामा करा अशी मागणी करुण देखील त्यांनी गाडी पो. स्टे. ला न्यावी लागेल असे सांगितले यामुळे यात नेमके काय शिजत आहे अशी सर्वांना शंका होती. अखेर पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






