ऐकावे ते नवलच : डाळिंबाच्या बागेत गांजाचे आंतरपिक ; पोलिसांच्या छाप्यात 13 लाखांचा 133 किलो गांजा जप्त

Spread the love

सांगली : – डाळिंबाच्यागेत गांजाचे आंतरपिक घेण्याचा प्रकारजत तालुक्यात उघडकीस आला . जत तालुक्यातील माणिकनाळ गावात पोलिसांनी छापा टाकत १३ लाख रुपयांचा १३३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित महासिद्ध बगली याला अटक केली आहे.

जत तालुक्यातील माणिकनाळ इथे महासिद्ध लक्ष्मण बगली याच्या डाळिंब बागेत छापा टाकून १३ लाख ३९ हजार १०० रुपयांचा १३३ किलो ९१ ग्रॅम ओला गांजा उमदी पोलिसांनी जप्त केला आहे. बगली हा कुटुंबासमवेत गावात राहतो. डाळिंबाच्या शेतात त्याने गांजाची लागवड केल्याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक पंकज पवार यांनी बुधवारी (३ ऑगस्ट) बगली याच्या शेतात छापा टाकला.

त्याच्या डाळिंब बागेत ५ ते ६ फूट उंचीची गांजाची लहान-मोठी झाडे सापडली. त्यांचे वजन १३३ किलो ९१ ग्रॅम होते. याची किंमत १३ लाख ३९ हजार १०० रुपये आहे. याबाबतची फिर्याद हवालदार श्रीशैल वळसंग यांनी दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार