Nashik Rape Case: विचित्र मानसिकता आणि पॉर्नोग्राफीमुळे विकृतीच्या जंजाळ्यात अडकलेल्या एका तरुणाने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार केले. एकदा नव्हे, तर सलग तीन वर्षे हा क्रूर प्रकार घडल्याचे समजते.
सातपूरमध्ये ‘चाइल्ड पॉर्न’चा प्रकार उघड; संशयिताला कोठडी
नाशिक: विचित्र मानसिकता आणि पॉर्नोग्राफीमुळे विकृतीच्या जंजाळ्यात अडकलेल्या एका तरुणाने सोळा वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार केले. एकदा नव्हे, तर सलग तीन वर्षे हा क्रूर प्रकार घडल्याचे समजते. पीडित मुलगा घरात कुणाशीही बोलत नसल्याने त्याच्याशी अधिक संवाद साधल्यावर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. सातपूर हद्दीत घडलेल्या ‘चाइल्ड पॉर्न’ प्रकाराबाबत संशयित गणेश वाघमारे (वय ३०) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये सायबर पोलिसांनी नाशिक शहरात ‘चाइल्ड पॉर्न’चा वापर झाल्याची धक्कादायक बाब उघड केली होती. त्यामध्ये शहरातील २५ संशयितांचा शोध सुरू केला होता. काही महिन्यांपूर्वी नाशिकरोड हद्दीत एका बालकाला सिगारेटचे चटके देण्याचा प्रकार घडला होता. यानंतर आता सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका सोळा वर्षीय मुलाला शेजारी राहणाऱ्या संशयिताने वेळोवेळी पॉर्न दाखविले. यानंतर त्या पीडित मुलावर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केले. २४ जुलै रोजी हा किळसवाणा प्रकार पुन्हा घडला. यापूर्वीही तीन वर्षांत हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. याबाबत पोलिस अधिक चौकशी करीत आहे.
संशयिताने वेळोवेळी पॉर्न दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक बाब पीडित मुलाने उघड केली. याप्रकरणी पीडिताच्या वडिलांनी त्वरित पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध तक्रार दाखल केली. यानुसार ३० वर्षांच्या तरुणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू पठाण यांनी संशयिताला न्यायालयात हजर केले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती सातपूर पोलिसांनी दिली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






