विविध गुन्ह्यातील पकड वारंट मधील सहा आरोपींना सोयगाव पोलिसांनी केली अटक!न्यायालयात हजर होत नसल्याचा ठपका.

Spread the love

सोयगाव,दि.०५…विविध गुन्हे दाखल असतांना न्यायालयाच्या कामकाजात हजर न होणाऱ्या दोन गावातील सहा आरोपींना सोयगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक करून सोयगाव पोलिसांनी त्यांना शुक्रवारी सोयगाव न्यायालयात हजर केले..त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

विविध गुन्हे दाखल असून न्यायालयात हजर न होणाऱ्या छगन ओंकार जाधव(वय 63) भीमराव ओंकार जाधव(वय 65) भागवत नामदेव मोरे(वय६०) सर्व.रा. माळेगाव(पिंप्री) आणि समाधान शिवाजी मिरगे(वय 29) राहुल शिवाजी मिरगे (वय 24) आणि सचिन कैलास ढमाले(वय 28) सर्व रा. म्हशिकोठा या सहा आरोपींना

सोयगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेवून शुक्रवारी सोयगाव न्यायालयासमोर हजर केले.सोयगाव पोलीस निरीक्षक अनमोल केदार,उपनिरीक्षक सतीश पंडित,रवींद्र तायडे,ज्ञानेश्वर सरताळे,जमादार राजू बर्डे,आदींच्या पथकांनी हि कारवाई केली…

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार