Video Virel : खराब रस्त्यांमुळे एकनाथ शिंदे भडकले, सरकारी अधिकाऱ्यांना जागच्या जागी केलं सस्पेंड

Spread the love

Potholes in Mumbai: “एकही खड्डा दिसला तर तुम्हाला सस्पेंड करेन” अशी तंबी त्यांनी नगर अभियंत्यांना दिली. मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

खराब रस्ते आणि रस्त्यावरील खड्डे हे जणू महाराष्ट्रातील जनतेच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. राज्यात कुठेही जा काही ठराविक ठिकाणं सोडली तर सर्वत्र खड्डेमय रस्ताच दिसेल. (bad road conditions in Mumbai) पावसाची एक सर येते आणि रस्त्यांची चाळण करून टाकते. या खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात होतात मात्र तरी देखील परिस्थिती मात्र जैसे थे. पण आता या खड्ड्यांविरोधात खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच कंबर कसली आहे. (potholes in mumbai) एकही खड्डा दिसला तर तुम्हाला सस्पेंड करून टाकू अशी तंबी त्यांनी नगर अभियंत्यांना दिली. मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

अधिकाऱ्याला सस्पेंड केलं

राज्यातील रस्त्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे वारंवार तक्रार केली जाते. परिणामी एकनाथ शिंदे यावेळी स्वत: रस्त्यावर उतरून अभियंत्यांना झापताना दिसत आहेत. “माणसं मरू लागली आहेत. तुम्ही याचा त्याचा रस्ता काय सांगता मला, इथले बॉस कोण आहेत? तुम्ही आहात का? ऑफिसमध्ये बसून कामावर लक्ष ठेवताय का? यांच्या निष्काळजीपणामुळे लोकं मेली आहेत. यांना आत्ताच्या आत्ता सस्पेंड करून टाका.” मुख्यमंत्र्यांनी अशा शब्दांत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

काय म्हणाले मुख्यमंत्री? पहा व्हिडिओ.:

मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

एकनाथ शिंदे यांचा हा अॅक्शन मोड व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. कारण खराब रस्त्यांमुळे राज्यातली जनता अक्षरश: हैराण झाली आहे. किमान आता तरी चांगले रस्ते पाहायला मिळतील अशी अपेक्षा जनता करत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार