शिक्षकांना शिकवू द्या, लेकरांना शिकू द्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सोमवारी आंदोलन

Spread the love

जळगाव :- गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रमांची बजबजपुरी ढिगभर कागदपत्रे, गुणतक्त्यांची खानापुर्ती, कार्यशाळा, प्रशिक्षणांची मांदियाळी आणि दुसरीकडे शाळेत शिक्षकांची कमतरता परिणामी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यााठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही विपरीत परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षकांना शिकवू द्या, लेकरांना शिकू द्या अशी घोषणा देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा जळगावच्या वतीने सोमवारी 8 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे निर्दशने सत्याग्रह करण्यात येणार आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनाच्या दृष्टीने शिक्षकांना अध्यापन कार्याव्यतिरिक्त इतर कोणतेही कामे देणे बंद करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची सध्याची शैक्षणिक स्थिती लक्षात घेवून त्यानुसार शिक्षकांना गरजेनुसार अध्ययन अनुभव देण्यासाठी स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. मात्र शैक्षणिक सत्राच्या ऑनलाईन, ऑफलाईन प्रशिक्षणे, कार्यशाळा, परिषदा दररोज सुरु आहेत. नवनवी शैक्षणिक उपक्रम देऊन सर्वच उपक्रम राबविण्यासह प्रत्येक उपक्रमांच्या नोंदी, अहवाल, प्रपत्राची पुर्तता करण्यातच शिक्षकांना गुंतवून ठेवले आहे.

जळगांव जिल्ह्यात 320 प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहे. शैक्षणिक प्रगती तपासणाऱ्या केंद्र प्रमुखाची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. या ठिकाणी शिक्षकच ग्रेडेड मुख्याध्यापकांची रिक्त पदांची संख्या देखील खुप मोठी आहे या ठिकाणी शिक्षकच मुख्याध्यापकाचे पद सांभाळतात. विद्यार्थी बसण्यासाठी संख्येच्या प्रमाणात बेंच, डेस्क, बैठक पट्टया अपुर्ण आहेत. गणवेश अनुदान पुरेशा प्रमाणात आलेले नाही. पाठ्यपुस्तके सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेले नाहीत.

शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबीत आहेत. जुनी पेन्शन योजना, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव, मुख्याध्यापकासह इतर पदोन्नती, शिक्षण सेवकांचे मानधन, पदवीधर वेतनश्रेणी, विविध पदाच्या परिक्षा असे प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करुनही शासन प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने दि.8 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी होणाऱ्या आंदोलनात शिक्षक व पालक यासह सर्व संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिवाजी भैय्या पाटील, जिल्हाध्यक्ष महेश पाटील, राजेश पवार, सैय्यद श.िफक, मनोज पाटील, अनिल पाटील, सैय्यद मुख्तार, देविदास सोनवणे, हितेंद्र पवार, विनोद पाटील, दिलीप बाविस्कर, योगेश धनगर, सुकदेव पाटील, विलास पाटील, वाल्मीक निकमअिनिल सुर्यवंशी, शेख अशपाक, प्रविण सुतार, हेमंत पाटील, अजित चौधरी इत्यादींनी केले आहे.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार