???? संमेलनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा बौद्ध शिक्षक व शिक्षकेतर संघाची स्थापना
जळगाव :- भारतीय बौद्ध साहित्य परिषद संलग्न बौद्ध साहित्य प्रसार संस्था आयोजित तिसरे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथे जानेवारी 2023 मध्ये संपन्न होणार असून राज्यातील तिनशे साहित्यिक दोन दिवस जळगाव येथे साहित्य संमेलनासाठी मुक्कामाला येणार असल्याची माहिती बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.भरत आत्माराम शिरसाठ यांनी दिली. सदर संमेलनाची फक्त शिक्षकांकरीता असलेली प्रथम नियोजन सभा आज संत चोखामेळा वसतिगृह जळगाव येथे संपन्न झाली. विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणाऱ्या बौद्ध महिला, बौद्ध नेते, बौद्ध साहित्यिक, बौद्ध युवक व बौद्ध कर्मचारी तसेच अन्य समाजातील विविध सामाजिक संघटनांसोबत येणाऱ्या काळात बैठका घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होणारे हे संमेलन ऐतिहासिक ठरणार असून बुद्धाची करुणा, मैत्री आणि प्रेम तत्त्वानुसार सर्व समाज घटकांचा या संमेलनात समावेश केला जाणार असल्याचे प्रतिपादन भरत शिरसाठ यांनी केले.
साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी जळगाव जिल्हा बौद्ध शिक्षक संघाची स्थापना सुद्धा यावेळी करण्यात आली. साहित्यिक राजेंद्र पारे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी जळगाव जिल्हा बौद्ध शिक्षक संघाची स्थापना सुद्धा यावेळी करण्यात आली. साहित्यिक राजेंद्र पारे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
सभेच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्धांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्राचे प्रसिद्ध गीतकार प्रतापसिंग बोदडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्रिशरण व पंचशीलाने सभेला सुरुवात झाली. 2022 ते 2027 या कालावधी करिता जळगाव जिल्हा बौद्ध साहित्य प्रसार संस्थेची कार्यकारिणी या प्रसंगी सर्वानुमते निवडण्यात आली. त्याचबरोबर तृतीय राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाची कार्यवाह समिती सुद्धा यावेळी गठीत करण्यात आली.
संमेलन यशस्वी होण्याकरिता डॉक्टर सत्यजित साळवे यांनी सविस्तर भूमिका मांडली. आंदोलनाच्या माध्यमातून विद्रोह व विरोध करीत असतांना बुद्धाची मैत्री आणि प्रेम सुद्धा आपण विसरता कामा नये असे आवाहन त्यांनी केले. तसेच संमेलन यशस्वी करण्यामागे शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. प्राध्यापक नरेंद्र गायकवाड यांनी साहित्य संमेलना संदर्भात करावयाच्या कार्यवाही वर सविस्तर प्रकाश टाकला. बुद्धाला एका जातीमध्ये बंदिस्त करता येणार नाही. बुद्ध हा सर्वांचा आहे आणि म्हणून बुद्ध विचाराच्या प्रचार आणि प्रसाराचे कर्तव्य सर्वच समाजाचे आहे असे प्रतिपादन धनराज मोतीराय अण्णा यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून राजेंद्र पारे यांनी तिसरे राज्य स्तरीय बौद्ध साहित्य संमेलन जळगाव येथे यशस्वी होण्याकरिता सर्व परीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सभेचे सूत्रसंचालन कैलास पवार यांनी केले. याप्रसंगी प्रशांत नरवाडे, प्रकाश तामस्वरे, भरत भिमराव शिरसाठ, छाया बैसाणे/ सोनवणे, योगेश्र्वरी इंगळे, सुवर्णा सुरवाडे, प्रवीण केदार, रावसाहेब जगताप, चिंतामण जाधव, भैय्यासाहेब सोनवणे, विनोद सपकाळे, रावसाहेब वानखेडे, माध्यमिक पतपेढीचे संचालक संजय निकम, साप्ताहिक लेखन मंचचे संपादक अजय भामरे, मिलिंद निकम, सोपान भवरे, कमलेश गायकवाड, सुरेश सुरवाडे, जिवनकुमार शिरसाठ, देवानंद वाघ, प्रशांत बोदवडे, महेश तायडे, मनोज नन्नवरे, समाधान जाधव, सुरेश सोनवणे, दिलीप प्रधान, इत्यादी प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी रणजीत सोनवणे, हेमेंद्र सपकाळे व युवराज वाघ यांनी परिश्रम घेतले.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.