ज्यांनी अवघा महाराष्ट्र सांभाळला त्या उद्धव साहेबांशी गद्दारी करणार्यांना यत्किंचित माफी नाही
मा.गुलाबरावजी वाघ.सहसंपर्क प्रमुख जळगाव.
धरणगाव प्रतिनिधी (योगेश पाटील):- संपूर्ण महाराष्ट्रात मा.पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी जी संवाद भेट सुरू केली आहे त्याचा झंझावात काही दिवसातच जळगांव जिल्ह्यात येत असून त्या अनुशंगाने शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ व जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज धरणगाव ग्रामीण शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत विविध खेड्यापाड्यातून निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हजर होते. आदित्य साहेबांच्या मार्गक्रमणाची इत्यंभूत माहिती गुलाबरावजी वाघ यांनी देत शिवसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले त्याच प्रमाणे विष्णूभाऊ भंगाळे यांनी आपल्या मनोगतात येणाऱ्या दौऱ्या विषयी सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थितांमध्ये कोणास अडचणी असल्यास आमच्याशी संपर्क साधावा असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ,जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे,मा.उपाध्यक्ष जि. प.जानकीराम पाटील,दीपक सोनवणे,मा.नगराध्यक्ष निलेश चौधरी,राजेंद्र ठाकरे,धिरेंद्र पुरभे,शरद माळी सर,वासू भाऊ चौधरी, अहमद पठाण,जीतूभाऊ धनगर भागवत चौधरी व ग्रामीणचे नंदलाल पाटील, गोविंद पाटील,संतोषभाऊ सोनवणे,भय्या पाटील,नरेश पाटील
भावसिंग सोनवणे, मोतीलाल गजरे विर्भान दादा, पोपट भाऊ व तालुक्यातील शाखा प्रमुख विभाग प्रमुख, सरपंच व उपसरपंच तसेच तमाम शिवसैनिक उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






