दुर्दैवी : बाल्कनीतून पडलेला मोबाईल वाकून पाहताना, साडेतीन वर्षीय मुलीचा सातव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू.

Spread the love

मुंबई ,( वसई ) :- सध्या लहान मुलांना मोबाइल वापरायचे व्यसन लागले आहेत त्यांचे दुष्परिणाम होत आहे अश्यातच लहान मुले ही किती चंचल असतात हे आपल्याला तर माहीतच आहे. अनेक वेळा ही लहान मूले पालकांचा डोळा चुकवून खेळायला जातात. परंतु कधी कधी पालकांचा दुर्लक्षपणा मुलांच्या जीवावर बेतू शकतो. अशीच एक घटना वसई येथून समोर आली आहे. एका साडेतीन वर्षीय मुलीचा सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वसई येथील अग्रवाल सिटीमध्ये महाजन कुटुंब हे सातव्या मजल्यावर राहत होते. शुक्रवारी सकाळी श्रेया महाजन या मुलीचा सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.

घटने दरम्यान आई श्रेयाच्या मोठ्या बहिणीला शाळेत सोडायला गेली होती. त्यामुळे घरात श्रेया आणि तिची आजी असे दोघेच होते. बाल्कनीत बसलेल्या श्रेयाच्या हातातून मोबाइल खाली पडला.

पडलेला मोबाईल पाहण्यासाठी श्रेया बाल्कनीतून खाली वाकून पाहत होती आणि त्या दरम्यान तिचा तोल गेला आणि ती सातव्या मजल्यावरून खाली पडली. यामध्ये या चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आई बहिणीला शाळेत सोडायला गेली तेव्हा श्रेया झोपलेली होती. ती जागी झाली तेव्हा तिला तिची आई दिसली नाही. त्यामुळे ती बाल्कनीत आईला बघायला गेली होती आणि तिच्या सोबत मोबाईल देखील होता. यादरम्यान तिचा मोबाईल खाली पडला आणि तो पाहण्यासाठी ती रेलिंग वर चढली आणि तिचा तोल गेला.

श्रेयाला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृ’त घोषित केले. एवढ्या लहान वयात मुलीच्या जाण्याने महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी पालकांनी देखील लहान मुलांच्या बाबतीत सावधगिरी बाळगायला हवी.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार