भाऊ शिंदे गटात(shinde gat) तर बहीण उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या पाठीशी आहेत. यामुळे पाचोरा-भडगाव मतदार संघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पाचोरा :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे आता अश्यातच जळगावमधील पोचारा येथील शिवसेना (Shiv Sena) संपर्क कार्यालयातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नावाचे फलक खाली उतरवले गेले असून, त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) वैशाली सूर्यवंशी यांच्या नावाचे फलक लागले आहेत.
शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना त्यांचं शिवतीर्थ शिवसेना कार्यालय खाली करावं लागलं आहे. कारण कार्यालय असलेले ठिकाण हे किशोर पाटील यांच्या बहीण वैशाली सूर्यवंशी यांची ती खासगी मालमत्ता आहे. वैशाली सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला होता. त्याचबरोबर मुंबई येथे कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेनेतच आहेत
कार्यलयावरूण बॅनर काढून घेतांनाचा व्हिडिओ :
येत्या 9 ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्यातील बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढणार आहेत. त्यामुळे वैशाली सूर्यवंशी या निष्ठा यात्रेच्या तयारीला लागल्या आहेत.
भाऊ शिंदे गटात तर बहीण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. यामुळे पाचोरा-भडगाव मतदार संघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पाचोरा येथील स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी कार्यालय उपलब्ध करून दिले होते.
तात्या पाटील यांच्या मृत्यू नंतर ते त्यांचे पुतणे आमदार किशोर पाटील यांच्या ताब्यात होते. मात्र, आता किशोर पाटील हे एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. तर तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी या उद्धव ठाकरे गटात राहिल्या आहेत. त्यामुळे भाऊ किशोर पाटील हे एकनाथ शिंदे गटात तर बहीण वैशाली सूर्यवंशी या उद्धव ठाकरे गटात असे पाचोऱ्यात चित्र निर्माण झाले आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.