मुंबई : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे अश्यातच आता शिंदे आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आलीय. गेल्या सव्वा महिन्यापासून शिंदे सरकरचा मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने विरोधकांकडून निशाणा साधला जात होता. मात्र अशातच आता उद्या 9 ऑगस्ट रोजी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आलीय.
दरम्यान, यावेळी 15 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे समजतेय. त्यामुळे या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच येत्या 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्याचं पावसाळी अधिवेशन पार पडणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. त्यामुळे या अधिवेशनापूर्वीच म्हणजे उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर संध्याकाळीच मंत्र्यांना खाते देण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी कॅबिनेटची बैठकही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्या 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी एकूण 15 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात भाजपच्या 8 आणि शिंदे गटाच्या 7 आमदारांचा समावेश असणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाकडून माजी मंत्र्यांना आधी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर भाजपकडून विधानसभेतील आमदारांना आधी संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शपथविधीच्या दिवशीच नेमकं चित्रं स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला त्यांच्या नंदनवन निवासस्थानी गेले. यावेळी रामदास कदमही उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. यावेळी मंत्रिमंडळाच्या यादीवरून शेवटचा हात फिरवण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
हे वाचलंत का ?
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.