चाळीसगाव प्रतिनिधी नेहा राजपूत
चाळीसगाव :- तुमच्यात जर सकारात्मकता असेल तर कोणीही तुम्हाला ध्येयप्राप्तीपासून थांबवू शकत नाही, असे प्रतिपादन एरंडोल येथील ऍड. मोहनजी शुक्ला यांनी चाळीसगाव जेसीआय सिटीच्या पदग्रहण समारंभावेळी केले.
चाळीसगाव जेसीआय सिटीचा पदग्रहण समारंभ दि. १२ जानेवारी २०२२ बुधवार रोजी सायं. ७ वा. हॉटेल रिलायबल खान्देशी कट्टा येथे संपन्न झाला.
सदर सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ऍड. मोहनजी शुक्ला, अध्यक्ष, औदुंबर साहित्य रसिक मंच, एरंडोल, पाचोरा येथील जेसी एचजीएफ मयूर दायमा, झोन उपाध्यक्ष, जेसीआय झोन १३ व चाळीसगाव जेसीआय सिटीचे माजी अध्यक्ष व रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी-संगमचे अध्यक्ष बालाप्रसाद राणा उपस्थित होते. व्यासपीठावर आयपीपी २०२१ मुराद पटेल, अध्यक्ष – २०२१ डॉ. प्रसन्न अहिरे, सचिव दिनेश चव्हाण, विद्यमान अध्यक्ष धर्मराज खैरनार उपस्थित होते.
ऍड. शुक्ला यांनी आपल्या मनोगतातून जेसीआयच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली व संपूर्ण जेसीआय टिमला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. प्रमुख अतिथी मयूरजी दायमा यांनी जेसीआय या संस्थेबद्दल उपस्थितांना माहिती सांगितली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. नंतर डॉ. प्रसन्न अहिरे यांनी त्यांच्या कार्यकाळाबद्दल माहिती दिली. पुढे सर्व मान्यवरांसमोर डॉ. प्रसन्न अहिरे यांनी धर्मराज खैरनार यांना कॉलर व पिन देवून जेसीआय २०२२ सालचा अध्यक्ष पदाचा पदभार सोपविला तसेच सचिन दिनेश चव्हाण यांनी विद्यमान सचिव मयूर अमृतकार यांनी सचिवपदाची पिन लावून २०२२ या सालचा जेसीआयचा सचिवपदाचा पदभार सोपविला. जेसीआय या संस्थेत नूतन सदस्य मनोज पाटील, मंगेश जोशी, नरेंद्र शिरुडे, वकार बेग, योगेश्वर राठोड, आतिश कदम, चंद्रकांत ठाकरे, जगन्नाथ चिंचोले, सलमान खान, सुनिल गायकवाड, दिपक खैरनार यांचे मयूर दायमा यांनी स्वागत करुन यावेळी त्यांचा जेसीआयच्या सदस्यपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम झाला. अध्यक्ष धर्मराज खैरनार यांनी झालेल्या उपक्रमांविषयी माहिती देवून पुढील उपक्रमांचे नियोजन सांगितले.
समारंभास जेसीआयचे माजी अध्यक्ष निलेश गुप्ता, संजय पवार, राजेंद्र छाजेड, सुनिल बंग, सचिन पवार, खुशाल पाटील, अफसर खाटीक, प्रितेश कटारीया, गजानन मोरे, बालाप्रसाद राणा, हरेश जैन, रविंद्र शिरुडे, माजी नायब तहसिलदार देविदासजी खैरनार, साप्ता. चाळीसगाव परिसरचे संपादक रविंद्र अमृतकार, बापूसाहेब खैरनार, दिनकर खैरनार, कमलेश पवार, सदाशिव खैरनार, कांतीलाल ठाकरे, विनोद कोठावदे, देवेश पवार उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशुतोष खैरनार, ऍड. शैलेंद्र पाटील, ऍड. सागर पाटील, जगदिश पटेल, साहिल दाभाडे, कुणाल राणा, सुवालाल सुर्यवंशी, महेंद्र कुमावत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन मोरे यांनी केले तर आभार सचिव मयूर अमृतकार यांनी मानले.