शिंदे गटाचे १२ आमदार संपर्कात, मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या रात्री विनायक राऊतांनी बॉम्ब फोडला.

Spread the love

हायलाइट्स:

  • राज्यात उद्या मंत्रिमंडळ विस्तार.

  • १८ ते २० मंत्र्यांचा शपथविधी.

  • विनायक राऊतांचा मोठा दावा

मुंबई :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार ३० जूनला स्थापन झालं होतं. एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार उद्या होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चिंता वाढवणारा दावा शिवसेना खासदारानं केला आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे फडणवीसांचं मंत्रिमंडळ औट घटकेचं आहे, असं म्हटलं. एकनाथ शिंदे गटातील अस्वस्थ असलेले १२ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं विनायक राऊत म्हणाले.यामुळं शिंदे फडणवीसांचं मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी टेन्शन वाढू शकतं.

विनायक राऊत काय म्हणाले

मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही ते म्हणजेच अब्दुल सत्तार आणि इतर आमदार एकमेकांच्या उरावर बसायला सुरुवात करतील. त्यामुळं शिंदे फडणवीसांचं मंत्रिमंडळ हे औटघटकेचं मंत्रिमंडळ ठरेल, असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे गटातील १२ आमदार अस्वस्थ आहेत आणि ते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

मंत्रिमंडळात कुणाला स्थान?

भाजपकडून उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात ९ ते १२ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन,राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे,अतुल सावे, गणेश नाईक, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा या नऊ जणांना मुंबईतून फोन गेला आहे. त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तर, एकनाथ शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, उदय सामंत, संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले यांचं नाव चर्चेत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार