अमळनेर प्रतिनिधी राहुल पवार
अमळनेर :- तालुक्यांतील वाघोदे येथील तरुण प्रशांत पाटील हा अमळनेर येथे प्रताप कॉलेज येथे शिक्षणाला वाघोदे ते अमळनेर नेहमी प्रमाणे सायकल ने प्रवास करीत असताना मंगरुळ रस्त्याला पेट्रोल पंप जवळ त्याला एक पाकीट आढळून आले.
ते पाकीट उघडून पाहिल्यावर त्याला त्याच्यामध्ये 3000 हजार रुपये रोख व आवश्यक कागदपत्रे आढळून आले. त्यांनी त्यांचे मित्र पत्रकार राहुल पवार यांना संपर्क करून सदर पाकीट रवींद्र भिका पाटील नामक व्यक्तीचे असल्याचे समजले व त्यांनी मंगरुळ बीट चे हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे यांच्या मदतीने सदर व्यक्तीस बोलवले आणि अमळनेर पोलिस स्टेशन मध्ये आल्यावर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे साहेब , हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे व स्वप्नील पाटील यांच्या उपस्थितीत रवींद्र पाटील यांच्या हवाली त्यांचे पाकीट केले . सर्वांनी प्रशांत पाटील च्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले.. वाघोदा ग्रामस्थांकडून तसेच मित्र परिवाराकडून त्याच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.