Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांना अवघ्या अवघ्या दोन वर्षात पुन्हा नव्या सरकारमध्ये ते दुसऱ्यांदा कॅबिनेट झाले आहेत. यापूर्वी ठाकरे सरकारमध्ये असताना ते कॅबिनेट मंत्री होते. जळगाव जिल्ह्याला आचा भाजपकडून गिरीश महाजन तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांच्या रूपाने दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहे.
जळगाव :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच मंंत्री मंडळ विस्तार झाला त्याात गुुुलाब भाऊ म्हणून जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. तर आक्रमक अशा आपल्या अनोख्या शैलीत भाषणामुळे शिवसेनेची मुलूख मैदान तोफ म्हणून गेल्या काळात गुलाबराव पाटील हे प्रसिध्द आहेत. गुलाबराव पाटील यांचा पानटपरी चालक ते तीन वेळा मंत्रीपदापर्यंतचा संघर्ष खूप मोठा आहे. अवघ्या दोन वर्षात पुन्हा नव्या सरकारमध्ये ते दुसऱ्यांदा कॅबिनेट झाले आहेत. यापूर्वी ठाकरे सरकारमध्ये असताना ते कॅबिनेट मंत्री होते. जळगाव जिल्ह्याला आचा भाजपकडून गिरीश महाजन तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांच्या रूपाने दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहे.
तरुण वयात गुलाबराव पाटीलही शिवसेनेच्या संपर्कात आले आणि बघता बघता कट्टर शिवसैनिक झाले. अनेक आंदोलनात गुलाबराव पाटील सहभागी होऊ लागले. आपल्या अनोख्या स्टाईलने आक्रमक आणि अस्सल गावरान अहिराणी भाषणांनी सभा गाजवल्या. यामुळेच पुढे ते शिवसेनेची मुलूख मैदानतोफ म्हणून ओळखले गेले.
१९९२ मध्ये ते पंचायत समिती सदस्य झाले. तर १९९७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यानंतर शिवसेना पक्षाच्या तिकिटावर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून गुलाबराव पाटील हे पहिल्यांदा १९९९ मध्ये आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ ची विधानसभा निवडणुक वगळता ते सातत्याने आमदार म्हणून निवडून आले.
छोट्याच्या कुटुंबातून पानटपरी चालक ते मंत्रीपदापर्यंतची वाटचाल या संघर्षाची गुलाबराव पाटील यांना जाणीव अजूनही आहे. त्यामुळेच आजही ते मंत्री असोत नसोत, लोकांच्या मदतीला धावून जातात. विभागातील विकास कामांपासून ते कौटुंबीक कलहापर्यंतच्या समस्या त्यांच्याकडे येत असतात. त्यामुळे त्यांचे गावातील कार्यालय नेहमी गजबजलेले असते. लोकांची कायम वर्दळ असते.
मात्र, नुकतेच शिवसेनेतून बाहेर पडून गुलाबराव पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिंदे गटात सहभागी झाल्यांनतर गुलाबराव पाटील यांच्यावर राज्यभरातून टीकेचे बाण उठले. मात्र, त्यांनी सर्वांना आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये उत्तर दिले. शिंदे गटात सहभागी झालो असलो तरी त्याची कारणे वेगळी आहेत. एका पानटपरी वाल्याला मंत्री बनविणारे बाळासाहेब ठाकरे त्यामुळे आजही बाळासाहेबांना आपण मानतो, त्यांना विसरणार नाही. त्यांच्याच विचाराने भविष्यात वाटचाल करु असंही गुलाबराव पाटील नेहमी सांगत असतात.
गुलाबराव पाटलांची राजकीय कारकीर्द –
- १९९९ – विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले
- २००४ – विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी
- २००९ – विधानसभेला पराभव, शिवसेना उपनेतेपदी निवड
- २०१४ – विधानसभा निवडणुकीत विजयी
- २०१६-२०१९ – फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री म्हणून कामकाज
- २०१९ – विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय
- जानेवारी २०२० – ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी
- ९ ऑगस्ट २०२२ – शिंदे सरकारमध्ये कॅबीनेट मंत्री
पाटलांची पाळधीत ‘नशीब’ पानटपरी
साधा पण आक्रमक, सरळ आणि निष्ठावान शिवसैनिक अशी गुलाबराव पाटलांची ओळख. गुलाबराव पाटील यांनी आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. गरीबी फक्त पाहिली नसून तर ती अनुभवली देखील आहे. पोट जगवण्यासाठी त्यांनी तमाशात सुध्दा काम केलं आहे. जळगाव नजीकच्या पाळधीत पान टपरी देखील चालवली. गुलाबराव पाटील हे जळगाव जवळच्या पाळधी या खेड्यात पानटपरी चालवत होते. या पानटपरीचं नाव ‘नशीब’ असं होतं. याबाबत गुलाबराव पाटील हे आजही आपल्या अनेक भाषणात आपण पानटपरीवाला होतो, पानटपरीवाल्याला बाळासाहेबांनी मंत्री बनवलं, अशी आठवण ते नेहमी सांगत असतात.
पाटलांचा ‘शिंगाडे’ मोर्चा गाजला
गुलाबरावांची आंदोलने हटकी राहिली आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक मोर्चे काढले. वीज प्रश्नावर अनेक मोर्चे काढले. वीज प्रश्वावर तर त्यांनी ‘शिंगाडे’ मोर्चा काढला होता. त्यांच्या याच आंदोलनामुळे ते लोकप्रिय झाले. अफाट वक्तृत्वामुळे त्यांना खान्देशची मुलुख मैदानी तोफ म्हणूनही संबोधले जाते.
मंत्री असूनही मुलगा नोकरीला
गुलाबराव पाटील चार वेळा विधानसभेवर निवडून गेले. पण त्यांनी कधी कुटुंबासाठी पदाचा लाभ घेतला नाही. घराणेशाही चालवली नाही. मुलांनाही सत्तेचा लाभ घेऊ दिला नाही. त्यांचा मुलगा आजही घर चालवण्यासाठी नोकरी करतो तर पत्नी शेतात राबते.
हे वाचलंत का. ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.