चोरवड ता. पारोळा येथील प्रगतशील शेतकरी मल्हार कुंभार यांच्या प्रक्षेत्रावर भेटी वेळी मान्यवरांनी व्यक्त केली भावना.
पारोळा : – चोरवड येथील प्रगतशील शेतकरी मल्हार प्रल्हाद कुंभार यांच्या प्रक्षेत्रावर नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री.मोहन वाघ व जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

या भेटीवेळी त्यांनी भावेश पोल्ट्री फार्म व व्ही.एम.के. इंटरप्राईजेस च्या माध्यमातून कृषि व कृषि पूरक व्यवसाय बाबतची पाहणी करून मार्गदर्शन केले. मान्यवरांनी कुक्कुटपालन, शेततळ्यातील मत्स्यपालन, शेळी पालन याबाबतची माहिती घेऊन अर्थकारण समजून घेतले.

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग यांनी शेतकऱ्यांनी शेती सोबतच शेतीपूरक व्यवसाय करून शाश्वत उत्पन्नाच्या दृष्टीने पाऊल उचलण्याचे आवाहन केले.

तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या भाडेतत्त्वावरील अवजारे बँक, पावर टिलर, तसेच फळबाग लागवड,तुती लागवड ची पाहणी करून मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोकरा योजने अंतर्गत मंजूर बांधावरील साग व बांबू लागवडीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते लागवड करून करण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना विभागीय कृषि सहसंचालक यांनी युवकांनी शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करून उपयोग केल्यास निश्चितचपणे शेती क्षेत्राची दशा व दिशा बदलण्यास फार मोठी मदत होईल असे प्रतिपादन केले.

सदरील प्रक्षेत्र भेटीवेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.संभाजी ठाकूर साहेब, कृषि उपसंचालक श्री.अनिल भोकरे साहेब, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. जाधववार साहेब, तालुका कृषि अधिकारी श्री. वारे साहेब, श्री.बोरसे साहेब, मंडळ कृषी अधिकारी शितल पाटील मॅडम व साळी मॅडम, कृषि पर्यवेक्षक सचिन लांडगे साहेब, कृषि सेवक श्री.अहिरे साहेब व परिसरातील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले