ताज्या बातम्यादेवगिरी कल्याण आश्रमातर्फे अदिवासींची आरोग्य तपासणी..By टीम झुंजार - December 24, 2021Spread the loveएरंडोल-देवगिरी कल्याण आश्रम संचालित महिला समिती एरंडोल यांच्यातर्फे तालुक्यातील शेताच्या पाड्यांवर राहणा-या तसेच आदिवासी वस्तीतीलल नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून आदिवासी बांधवाना विविध औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. शहरातील उत्तमनगर,पद्मालयफाटा येथे देवगिरी कल्याण आश्रमाच्या महिला समितीच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरात सुमारे शंभर आदिवासी मुळे,पुरुष व महिलांची आरोग्य तपासणी करून त्याना औषधांचे वाटप करण्यात आले.डॉ.चेतन भावसार आणि डॉ.पंकज अमृतकर यांनी आदिवासींची आरोग्य तपासणी करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.आदिवासी समाज रोजगारासाठी विविध शेतांमध्ये तसेच गावाच्या बाहेर वस्ती करून राहत असल्यामुळे त्यांना आरोग्याच्या सेवा पुरेशा प्रमाणावर उपलब्ध होऊ शकत नाही.आदिवासींमध्ये आरोग्याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने देवगिरी कल्याण आश्रमतर्फे विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.शिबिरासाठी देवगिरी कल्याण आश्रम महिला समितीच्या सदस्या पल्लवी मोरे,मंजुषा पाटील,संध्या महाजन,सारिका पाटील,सागर पाटील यांचेसह दयाराम पावरा,प्रकाश बारेला,दिनेश पावरा यांचेसह पदाधिका-यांनी सहकार्य केले.आदिवासी आणि गरीब नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करून औषधांचे वाटप केल्याबद्दल पाड्यावरील महिलांनी समाधान व्यक्त केले.एरंडोल-एरंडोल येथे आदिवासी वस्तीत आरोग्य तपासणी करताना डॉ.पंकज अमृतकर व डॉ.चेतन भावसार.