सुमित पाटील वावडदा (प्रतिनिधी) जळगाव दि ११ साऱ्या जगाचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांचे रक्षण करण्यासाठी नारीशक्तीने बांधले पोलीस बांधवांच्या हातावर रक्षा सूत्र रक्षाबंधन सण बहिण भावाच्या पवित्र प्रेमाने गुंफलेला एकाच धाग्यात लाखभर भावनांचा बांधला गेलेला सोहळा म्हणजे राखी प्रेम आपुलकी आणि जबाबदारीच्या नात्याचं काळजावर आपोआपच आखलेले चित्र म्हणजे राखी अशा प्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व इनरव्हील क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस बांधवांना राख्या बांधण्यात आल्या
याप्रसंगी नारीशक्तीच्या व इनरव्हील क्लबच्या महिलांनी कधी सुट्टी नसलेल्या व सतत सेवेत असणाऱ्या पोलीस बांधवांच्या प्रति राखी बांधून बहिणीचे कर्तव्य पूर्ण केले याप्रसंगी जळगाव शहर आमदार राजू मामा भोळे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा साहेब , समाज कल्याणचे भरत चौधरी यांचेसह
व इतर पोलीस बांधवांच्या हातावर संस्थेच्या अध्यक्ष सौ मनीषा पाटील, इनरव्हील क्लब चे अध्यक्ष डॉ रितू कोगटा,नूतन तासखेडेकर, रेणुका हिंगु ,माधुरी शिंपी, योगिता बाविस्कर, भाग्यश्री महाजन, उल्का पाटे, अनिता पाटील, कविता पाटील, रंजन शहा,निकिता अग्रवाल, डॉ शितल अग्रवाल यांनी राख्या बांधल्या. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे याप्रसंगी मौलाना अल्पसंख्यांक फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष फिरोजा शेख यांनादेखील नारीशक्तीने राखी बांधून सगळ्यांना सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
राष्ट्राचे ऐक्य जोपासणारा व संदेश देणारा पवित्र प्रेमाचा रक्षाबंधन हा सण नारीशक्ती व इनरव्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आल्या याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले. आभार नूतन तासखेडकर यांनी मानले.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.