सुमित पाटील प्रतिनिधी वावडदा
जळगाव :- शहरातील रोटरी भवन मायादेवी नगर या ठिकाणी जळगाव प्रकल्प संचालक आत्मा जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील युवा आदर्श शेतकरी मयुर अरुण वाघ बांबरुड राणीचे तालुका पाचोरा यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांची विक्री शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली.
या महोत्सवाच्या उद्घाटनादरम्यान जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी युवा आदर्श शेतकरी मयुर अरुण वाघ याना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या महोत्सवात पाचोरा तालुक्यातील गाव बांबरुड राणीचे यांनी सहभाग नोंदवला या महोत्सवात रानभाज्या म्हणजे कटूरले, अंबाडी, शेवगा, हादगा, फांग, पाथरी, तरोटा, अरबी कंद इ. रानभाज्या विक्री करता ठेवण्यात आल्या होत्या.
या महोत्सवास जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, महापौर सौ. जयश्रीताई महाजन, नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री.मोहन वाघ, उपवनरक्षक श्री. विवेक हौसिंग, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी श्री.संभाजी ठाकूर, प्रकल्प उपसंचालक श्री.अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक आत्मा श्री. कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी श्री. वैभव शिंदे,
रोटरी क्लब ऑफिसचे अध्यक्ष श्री. सुनील सुखवानी, सचिव श्री. विवेक काबरा, प्रकल्प प्रमुख श्री. योगेश भोळे व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते. या महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव, कृषि सहाय्यक यांनी शेतमाल व शेतकरी विक्री करता घेऊन येण्याची व्यवस्था करून सहकार्य केले.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.