जळगाव येथून प्रवाशी घेवून पाचोऱ्याकडे क्रंमाक – एम. एच. १५ इ. एक्स. १८३२ या क्रमांकाचे वाहन जात होते. या वाहनाला खेडगावजवळ एम. एच. १९ सी. वाय. ९२२३ या क्रमाकांच्या मालवाहू वाहनाने धडक दिली. धडक एवढी जोरदार होती, या अपघातात प्रवाशी वाहन थेट रस्त्याच्या खाली उलटले होते. प्रवासी वाहनात शिरसोली येथून भडगाव येथे रक्षाबंधनासाठी जाण्यासाठी अनिता भगवान सोनवणे या बसल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा गणेश हा ११ महिन्यांचा चिमुकला सुध्दा होता.
जळगाव : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव-पाचोरा रस्त्यावर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनास भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रिक्षातील ११ महिन्याचा चिमुकला जागीच ठार झाला असून ९ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील खेडगावजवळ हा अपघात झाला आहे. गणेश भगवान सोनवणे (रा. दापोरा, शिरसोली) या चिमुकल्याचा अपघातात मृत्यू झाल्याने जळगावात हळहळ व्यक्त होत आहे.
जळगाव येथून प्रवाशी घेवून पाचोऱ्याकडे क्रंमाक – एम. एच. १५ इ. एक्स. १८३२ या क्रमांकाचे वाहन जात होते. या वाहनाला खेडगावजवळ एम. एच. १९ सी. वाय. ९२२३ या क्रमाकांच्या मालवाहू वाहनाने धडक दिली. धडक एवढी जोरदार होती, या अपघातात प्रवाशी वाहन थेट रस्त्याच्या खाली उलटले होते. प्रवासी वाहनात शिरसोली येथून भडगाव येथे रक्षाबंधनासाठी जाण्यासाठी अनिता भगवान सोनवणे या बसल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा गणेश हा ११ महिन्यांचा चिमुकला सुध्दा होता. वाहनात बसल्यावर काही अंतरावर वाहनाचा अपघात झाला. यात वाहनाखाली दबल्या जावून चिमुकला गणेश सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी अनिता सोनवणे यांचा मनहेलावणारा असा आक्रोश केला.
चालकासह वाहनातील नऊ प्रवासी जखमी
तसेच या अपघातात वाहनाचे चालक भैय्या कोळी रा. खेडगाव नंदीचे ता. पाचोरा, तसेच प्रवासी अनिता पवन चव्हाण (वय – ३८) रा. कोकडी तांडा ता. पाचोरा, सुशिलाबाई धनराज राठोड (वय – ३८) रा. रामदेववाडी ता. जळगांव, विकास सुरेश पवार (वय – २७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, आदित्य विकास पवार (वय – ७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, अनिता भगवान सोनवणे (वय – २२) रा. दापोरा (शिरसोली), लता गोकुळ राठोड (वय – ३७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, ऋषीकेश प्रदिप पंडित (वय – १६) रा. लासगाव ता. पाचोरा व निकीता गोकुळ राठोड (वय – १४) रा. रामदेव वाडी ता. जळगांव हे ९ जण जखमी झाले आहेत.
मालवाहू वाहनावरील चालक पोलिसांच्या ताब्यात
अपघाताची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वल्टे, समीर पाटील, संदिप भोई व योगेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना रुग्णालयात हलविले तसेच वाहतूक सुरळीत केली. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मालवाहू वाहनावरील चालकास पाचोरा पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.